सावधान ! लोकांना मदत करून फोटो सेशन करताय ? तर तुमच्यावर होणार गुन्हा दाखल...

police take action on who photoshoot with Helping people
police take action on who photoshoot with Helping people
Updated on

इस्लामपूर - सावधान कोरोना विषाणूच्या लॉक डाऊनच्या कालावधीत लोकांना मदत करून फोटो सेशन करताय ?  आता तुमच्यावर होणार गुन्हा दाखल.... याबाबतचा आदेश वाळवा विभागाचे प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी काढला आहे.वाळवा तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही लोक इस्लामपूरच्या शहरवासीयांना मदत करताना फोटो काढून प्रसिद्ध करत आहेत. काही ठिकाणी दिलेली तर मदत वीतभर असते मात्र त्याचे फोटो सेशन करून चिपट्याच्या दळणाला पायलीचे गाणे म्हटले जात असल्याचे दिसत आहे.लोकांना ओळीत उभे करून आपण दिलेल्या मदतीचे फोटो काढून माणुसकीला लाज वाटेल असे फोटो सेशन केले जाते.

शासनाने कोरोना विषाणूचा प्रसार खंडित करण्यासाठी देशात सध्या ३० एप्रिल पर्यंत लॉक डाऊन जाहीर करण्यात आले आहे.या कालावधीत सर्व उद्योगधंदे,कारखाने,रोजंदारीची कामे पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत.याचा सर्वात जास्त परिणाम मजूर वर्गावरती झालेला आहे.आर्थिक फटका या नागरीकांना बसला आहे.अत्यंत गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.यामुळे साहजिकच समाजातून अशा लोकांच्या साठी असंख्य मदतीचे हात पुढे येऊ लागले आहेत.अन्न धाण्याचे कीट,तयार शिजवलेले अन्न,आरोग्याचे कीट अशा स्वरूपाची मदत लोकांच्या कडून विस्थापित कामगारांना येऊ लागली आहे. या कामगारांच्या वस्तीच्या ठिकाणी देणगीदार प्रसिद्धीसाठो फोटो काढणे, व्हिडीओ शूटिंग करणे यामुळे अशा ठिकाणी दिवसेंदिवस गर्दी वाढू लागली आहे.

शासनाने दिलेल्या सोशल डिस्टन्स या नियमावलीचे सरळसरळ उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे.तसेच या मध्ये  मदती पेक्षा प्रसिद्धी ला जास्त महत्व दिले जाते असे उघड उघड दिसून येत आहे.या बाबीचे प्रमाण जास्त वाढू लागले आहे. यामुळे शासनाने कोणत्याही संस्थेने किंवा वैयक्तिक व्यक्तीने  विस्थापित कामगारांना अन्नधान्याचे ,जेवणाचे कीट वाटण्यावरती बंदी केली आहे.असे आढळून आल्यास त्यांच्या वरती गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

यासाठी ज्या संस्थेला किंवा एखाद्या व्यक्तीला कामगारांना रोख अथवा अन्नधान्य स्वरूपात मदत करावयाची आहे त्यांनी संबंधित गावच्या ग्रामपंचायत, नगरपालिका, तहसील कार्यालय,पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी जमा करण्यात यावेत.त्याची रीतसर पोच पावती घ्यावी.वाटपाचा तपशील घ्यावा

"गरजू लोकांना देण्यात येणारी मदत याचे योग्य नियोजन नाही.कोण कोणती मदत देणार याची नोंद नाही.यामुळे कोरोना विषाणूचा  प्रसार होण्याची भीती आहे. यासाठी येणाऱ्या मदतीचे  एकत्रित करून त्याचे वाटप करणे गरजेचे आहे.शासनाच्या कार्यालयातून  मदत देणाऱ्यांच्या  नावांची यादी प्रसिद्ध केली जाईल."
 नागेश पाटील - उपविभागीय अधिकारी वाळवा विभाग,इस्लामपूर

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com