कोरोनाच्या घाट्यात मटनाचा वाटा अन् पोलिसांनीच समाचार घेतला मोठ्या थाटात...

police take action youngsters who celebrate motton party in belgum
police take action youngsters who celebrate motton party in belgum
Updated on

बेळगाव - सध्या मटनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे तसेच लॉकडाऊनमुळे मटनची दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे अनेकजण बकरे कापुन वाटे घालण्यावर अनेकांनी भर दिला आहे. मात्र वडगाव शिवारात बकरे कापुन वाटे घालण्याचा प्रकार काही जणांच्या अंगलट आला आहे कारण शिवारात गर्दी झाल्याचे दिसताच पोलीस आल्याने मटन टाकुन पळण्याची वेळ वाटे घालणाऱ्यांवर आली आहे. तसेच शिवारात मटन टाकुन पळणाऱ्या युवकांची चर्चा सध्या शहरात जोरात होऊ लागली आहे.

मटण खायची आवड असली तरी लॉकडाऊनमुळे मटन सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने आणि मटनाच्या दरात वाढ झाल्याने अनेक ठिकाणी वाटे घातले जात आहेत याला प्रतिसादही मोठा मिळु लागला आहे. वडगाव परिसरातील युवकांनी सात हजार रुपयांना बकरे खरेदी केले काही प्रमाणात वाटे घालायचे तर बाकीचे मटनाची शिवारात पार्टी करायचा बेत आखुन युवक साहित्यासह शिवारात पोहचले
तसेच एका झाडाखाली बकरे मारुन वाटे घालण्यास सुरुवात झाली होती तर काहीजण मूंडी, डोके शिवारात शिजविण्याची तयारी करीत होते तेवढ्यात रस्त्यांवर गस्त घालणारे काही पोलीस झाडाखाली झालेली गर्दी पाहुन शिवारात दाखल झाले हे पाहताच वाटे घालणाऱ्या सर्वांची गाळण उडाली. हातात लाठ्या घेऊन पोलीस यांच्या रोखानेच येत असल्याचे पाहुन घातलेले वाटे व पार्टीसाठी आणलेली भांडी, मसाला इतर साहित्य तेथेच टाकुन युवकांनी धूम ठोकली.

पोलीस कोणीतरी परत येईल म्हणुन शिवारात बराचवेळ थांबुन होते मात्र कारवाई होईल या भितीने कोणीही पुढे आले नाही. मात्र शिवारात वाटे घालणाऱ्या युवकांना मटन मात्र चांगलेच महाग पडल्याची चर्चा शिवारात ऐकावयास मिळत असुन गेल्या काही दिवसांपासुन शिवारात पार्टया करणाऱ्या युवकांची संख्या वाढली असुन पार्टया झाल्यानंतर कचरा व बाटल्या शिवारात टाकल्या जात आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होत आहे. त्यामुळे शिवारात पार्टया करणाऱ्या युवकांवर कडक कारवाई करणे आवश्‍यक आहे असे मत व्यक्‍त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com