पॉंलिटेक्‍निक, फार्मसीची लेखी परिक्षा आजपासून 

Polytechnic, Pharmacy Written Exam From Today Kolhapur Marathi News
Polytechnic, Pharmacy Written Exam From Today Kolhapur Marathi News
Updated on

गडहिंग्लज : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे (एमएसबीटीई) उद्यापासुन (ता. 2) पदविका आभिंयांत्रिकी (पॉंलिटेक्‍निक), औषधनिर्माणशास्त्र (डी. फार्मसी) अभ्यासक्रमाच्या सत्र लेखी परिक्षेला सुरवात होत आहे. कोरोनामुळे व्दितीय, तृतीय वर्षाची ही परिक्षा ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. परिक्षेचा सराव व्हावा यासाठी दोन चाचणी परिक्षा ऑनलाईन झाल्या. विद्यार्थ्यांना इंटरनेट असणाऱ्या मोबाईल, संगणकाच्या सहाय्याने ही परिक्षा द्यावी लागणार आहे. 23 मार्चपर्यंत परिक्षा आहे. या परिक्षेचा 1 एप्रिलला निकाल जाहीर होणार आहे. 

दरवर्षी डिसेंबर-जानेवारी महिन्यात पॉलिटेक्‍निक, डी. फार्मसीच्या हिवाळी सत्राच्या परिक्षा होतात. मात्र, कोरोनामुळे गत शैक्षणिक वर्षातील उन्हाळी परिक्षाच पाच महिने रखडल्या. आक्‍टोंबरमध्ये या परिक्षा झाल्याने साहजिकच हिवाळी परिक्षेला उशीर झाला. तिसऱ्या व पाचव्या सत्राचा सर्वच अभ्यासक्रम ऑनलाईन शिकविला गेला. परिक्षेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या एकत्र येण्याने संर्सग अधिक वाढू नये यासाठी पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या परीक्षा उन्हाळी परीक्षा रद्द झाल्या होत्या. फक्त अंतिम वर्षाच्या (तृतीय) परिक्षा ऑनलाईन झाल्या. 

व्दितीय, तृतीय वर्षाच्या नियमित आणि बॅकलॉग विषयांच्या विद्यार्थ्यांची ही परीक्षा होत आहे. प्रात्यक्षिक परीक्षा 15 ते 24 फेब्रुवारी अखेर झाल्या. परीक्षेसाठी एक तास वेळ दिला आहे. बहूपर्यायी 40 प्रश्‍न असणार आहेत. त्यापैकी 30 प्रश्‍न सोडवावे लागणार आहेत. विद्यार्थी लॉगइन झाल्यापासुन एक तास वेळ मिळेल. प्रत्येक प्रश्‍नाला एक गुण आहे. परिक्षेला निगेटीव्ह मार्किंग पध्दत नाही. एखाद्या प्रश्‍नाबाबत आक्षेप असल्यास विद्यार्थी संस्थेच्या प्राचार्यांकडे ऑनलाईन हरकत नोंदवु शकतात. संस्था देखील परिक्षेच्या कालावधीत मदतीसाठी कार्यरत असणार आहेत. 

ड्रॉंईग परिक्षेत सुट 
आभियांत्रिकी ड्रॉंईग, आर्किटेक्‍चर डिझाईन, बिल्डींग ड्रॉंईग, केमिकल इंजिनिंगरिंग ड्रॉंईग, मॅंकेनिकल इंजिनिंगरिंग ड्रॉंईग, बिल्डींग प्लॅंनिंग ड्रॉंईग या विषयांच्या परिक्षा बहूपर्यायी पध्दतीने शक्‍य नाहीत. परिणामी, ऑनलाईन सादरीकरण अथवा तोंडी प्रश्‍नोतरांच्या आधारे या विषयांच्या संस्थास्तरावर परिक्षा घेण्याची सुचना एमएसबीटीईने केली आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Madhuri’s 1,160 Km Journey From Vantara to Kolhapur
Madhuri Elephant Nandani Math Return
Dahi Handi Govinda death in Shirol
Topcha Six Lane Flyover Stuck in Contractor Dispute New Tender Process May Delay the Highway Project Further
Marathi News Esakal
www.esakal.com