
हरळी खुर्द-वैरागवाडी (ता. गडहिंग्लज) येथील रस्त्याच्या दुरुस्तीअभावी चाळण झाली आहे. जागोजागी रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
महागाव : हरळी खुर्द-वैरागवाडी (ता. गडहिंग्लज) येथील रस्त्याच्या दुरुस्तीअभावी चाळण झाली आहे. जागोजागी रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. डांबरीकरणासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करत लोकप्रतिनिधीकडे ठराव व निवेदन देण्यात आली आहेत, तरीही या रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही. याबाबत कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा करू, असा इशारा भ्रष्टाचार निर्मूलन समितीने दिला आहे.
हरळी खुर्द ते वैरागवाडी हा तीन किलोमीटरचा रस्ता आहे. या रस्त्याचा वापर इंचनाळ, हरळी खुर्द व हरळी बु. गावातील विद्यार्थी व ग्रामस्थ, संत गजानन महाराज शिक्षण समूह, वैरागवाडी, हासुरवाडी, हासुरसासगिरी, हलकर्णीसह कर्नाटक भागातील ग्रामस्थ करतात. हरळी साखर कारखाना व गडहिंग्लजकडे जाण्यासाठीही या रस्त्याचा वापर होतो. कारखान्याला पूर्व भागातील ऊस याच मार्गावरून जातो.
रस्त्याची दुरूस्ती व्हावी यासाठी हरळी, वैरागवाडी व हासुरवाडी या गावातून संबधित विभागाकडे पाठपुरावा केला. लोकप्रतिनिधीकडे ठराव व निवेदन देण्यात आली आहेत. तरीही या रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
आंदोलन करू
हरळी-वैरागवाडी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी निवेदन व ग्रामपंचायतीकडून ठराव देण्यात आले आहेत. तरीसुद्धा या रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे या मार्गावरून वाहन चालविताना अडचणी येत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे. अन्यथा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडून आंदोलन करण्यात येईल.
- संजय नाईक, अध्यक्ष, भ्रष्टाचार निर्मूलन समिती, गडहिंग्लज
संपादन - सचिन चराटी
kolhapur