esakal | वीजदरातील कपात हे अर्धसत्य ; प्रताप होगाडे

बोलून बातमी शोधा

pratap hogade reduce electricity tariff kolhapur ichalkaranji}

शासन, आयोग अथवा महावितरण यांनी नविन असे काही केले नाही. केवळ शिळ्या कढईला ऊत आणण्याचाच हा प्रकार आहे

वीजदरातील कपात हे अर्धसत्य ; प्रताप होगाडे
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी - महावितरणच्या वीज दरात सरासरी 2 टक्के कपात करण्याची माहिती ही अर्धसत्य आहे. सरासरी दोन पैसे म्हणजे 0.3 टक्के कपात हे पूर्ण सत्य आहे, अशी माहिती महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी आज दिली. मुळात शासन, आयोग अथवा महावितरण यांनी नविन असे काही केले नाही. केवळ शिळ्या कढईला ऊत आणण्याचाच हा प्रकार आहे, अशी खरमरीत टिकाही त्यांनी केली आहे. 

श्री. होगाडे म्हणाले, "काही वर्गवारीत दर कपात 1 ते 4 टक्के आहे, हे खरे आहे. पण एकूण सरासरी देयक कपात फक्त प्रति युनिट 2 पैसे आहे. म्हणजे सध्या सरासरी देयक दर 7.28 रुपये प्रति युनिट आहे. तो 1 एप्रिलपासून 7.26 रुपये प्रति युनिट होणार आहे. सही सरासरी कपात 0.3 टक्के आहे. हा आयोगाचा बहुवर्षीय दरनिश्‍चीती आदेश गेल्यावर्षी 30 मार्च रोजीच झालेला आहे. त्यामुळे नविन काहीही घडलेले नाही. इंधन समायोजन आकार याचे अद्याप प्रमाणीकरण व निर्धारण झालेले नाही. ते भावी काळात होणार आहे. ते झाल्यानंतरच कपात की वाढ हे चित्र स्पष्ट होणार आहे.' 

एप्रिल 2022 नंतर कंपनी फेरआढावा याचिका दाखल करणार आहे, हे निश्‍चीत आहे. 2023 - 24 व 2024-25 या दोन वर्षात राज्यातील वीज ग्राहकांना पुन्हा दरवाढीचा फटका बसणार आहे, हे निश्‍चीत आहे. मुळातच महाराष्ट्रातील घरगुती, औद्योगिक, व्यापारी व शेतीपंप या सर्व वर्गाचे वीजदर देशात सर्वात जास्त आहेत. औद्योगिक वीजदर सभोवतालच्या सर्व राज्यापेक्षा 10 ते 40 टक्के जास्त आहेत. अशा परिस्थीतीत केवळ 0.3 टक्के कपात म्हणजे काहीच नाही, असे श्री.होगाडे यांनी स्पष्ट केले. 

  संपादन - धनाजी सुर्वे