esakal | पक्षिय पातळीवर उमेदवार निवडीच्या हालचाली सुरू; भाजप अध्यक्षांचा दौरा, कॉंग्रेसतर्फे बैठक 
sakal

बोलून बातमी शोधा

Preparations for Lok Sabha by elections begin in belgaum

केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांचे सप्टेंबरमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. त्याजागी पोटनिवडणूक आहे

पक्षिय पातळीवर उमेदवार निवडीच्या हालचाली सुरू; भाजप अध्यक्षांचा दौरा, कॉंग्रेसतर्फे बैठक 

sakal_logo
By
महेश काशीद

बेळगाव - प्रशासकीय पातळीवर लोकसभा पोटनिवडणुकीच्या तयारीला सुरवात झाल्यामुळे राजकीय पक्षांकडून निवडणुकीच्या आखाड्यात कोणाला उतरवायचे? त्याची आता चाचपणी सुरु केली आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष पुढील आठवड्यामध्ये बेळगावचा दौरा करणार आहेत. तर कॉंग्रेस राज्य कार्यकारणीची 21 नोव्हेंबरला बेळगाव येथे महत्वाची बैठक बोलावली आहे. 

निवडणुकीची तयारी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा अभिप्राय व संभाव्य उमेदवारांची चाचपणी या कालावधीत केली जाणार आहे. 

केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांचे सप्टेंबरमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. त्याजागी पोटनिवडणूक आहे. त्यासाठी मतदार यादी तयार करणे, मतदार केंद्रांची स्थापना आणि ईव्हीएम मशिन्स किती लागतील, त्याची माहिती घेतली जात आहे. निवडणूक आयोगाच्या पातळीवर पोटनिवडणुकीची तयारी सुरु झाल्यामुळे राजकीय पक्षांच्या हालचाली वाढू लागल्या आहेत. कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारी आणि उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. याबाबतचा कानोसा घेण्यासाठी पुढील आठवड्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे कर्नाटकाचा दौरा करणार आहेत. मुळात ते दक्षिण भारतचा दौरा करणार असून, या दरम्यान कर्नाटक आणि बेळगावला भेट देणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची तारीख व वेळ अजून निश्‍चित नाही. पुढील आठवड्यात दौरा निश्‍चित मानला जात आहे. दौऱ्यात आगामी लोकसभा पोटनिवडणूक आणि संभाव्य उमेदवार संदर्भात चर्चा होण्याची शक्‍यता आहे. तसेच पदाघिकारी व कार्यकर्त्यांना निवडणूक पूर्वतयारीला लागण्याबाबत कळविले जाईल. 

कॉंग्रेसतर्फे निवडणूक गंभीरपणे घेतली जात आहे. उमेदवारांची चाचपणी, बैठक आयोजिली आहे. 21 नोव्हेंबरला बैठक बोलावली आहे. बेळगावात आयोजित बैठकीत उमेदवारांची चाचपणी केली जाणार आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे बैठक महत्वाची मानण्यात येत आहे. बैठकीत उमेदवारांबाबत महत्वाचे निर्णय घेऊन प्रस्ताव राष्ट्रीय कार्यकारणीला पाठविला जाईल, अशी माहिती कॉंग्रेस सुत्रांनी दिली. 

हे पण वाचा किती आले किती गेले, मुंबईकरांचे प्रेम मात्र शिवसेनेवरच 

इच्छूकांची फिल्डींग 

केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांनी सलग चारवेळा विजय मिळवल्यामुळे बेळगाव भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. पण, त्यांच्या निधनानंतर त्याजागी कोणाला उमेदवारी मिळते, हे पाहणे औत्सूक्‍यतेचे ठरले आहे. भाजपात अंगडी कुटूंबियांसह विविध नेत्यांनी उमेदवारी देण्यासाठी फिल्डींग लावली आहे. पक्षश्रेष्ठींकडे पाठपुरावा सुरु केला आहे. तसेच कॉंग्रेसमध्ये अनेकांनी नावे पुढे येत आहेत. यामुळे कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते, याकडे साऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे 

go to top