Preparing for the rainy season: Testing of disaster relief materials
Preparing for the rainy season: Testing of disaster relief materials

तयारी पावसाळ्याची ः आपत्ती काळातील साहित्याची चाचणी

Published on

कोल्हापूर : संभाव्या पूरस्थितीसाठी प्रशासनाच्या सज्जतेसाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाने आपत्ती व्यवस्थापनासाठी उपलब्ध असलेल्या सर्व साधनसामुग्रीची आज पंचगंगा घाट येथे प्रात्यक्षिके घेण्यात आली. यामध्ये रेस्क्‍यु बेल्ट, बीए सेट, पोर्टेबल पंप, फायर सुट, लाईफ जॅकेट, सेप्टी नेट, लिफ्टींग बॅग, हायड्रोलीक स्प्रेडर कटर व जॅक, सॉ कटर, स्लॅब कटर, लाईफ बॉय, मनिला रोप, फ्लोटींग पंप, रबरी बोटी, लाईफ़ रींग इ. सर्व साहित्याची यशस्वी चाचणी आज घेतली. 
यावेळी अग्निशमन विभागाच्या जवानांनी शोध व बचाव कसा करावा, बुडणाऱ्या व्यक्तींना कसे वाचवावे यांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. महापौर सौ. निलोफर आजरेकर यांनी मागील वर्षी पूराचा अनुभव पाहता यावर्षी महापालिकेने खरबदारी घेऊन योग्य त्या उपायोजना केलेल्या आहेत. नागरीकांनीही प्रशासनास सहाकार्य करावे, असे आवाहन केले आहे. 
आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी महापालिकेकडे सात बोटी आहेत. आणखी तीन बोटी खरेदी करण्यात येत आहेत. त्या बोटी लवकरच महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे दाखल होत आहेत. तसेच नागरीकांच्या सुरक्षेसाठी 75 लाईफ जॅकेट घेतले आहेत. यावेळी उपआयुक्त निखिल मोरे, सहाय्यक आयुक्त अवधूत कुंभार, चेतन कोंडे, मुख्य अग्निशमन अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रणजित चिले, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, स्थानक अधिकारी तानाजी कवाळे, मनीष रणभिसे, दस्तगीर मुल्ला, आश्‍पाक आजरेकर व अग्निशमन विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. 

दीच्या इशारा पातळीला स्थलांतर करा ः आयुक्त 
संभाव्य पूर परिस्थी पाहता पूर बाधीत क्षेत्रातील नागरीकांनी नदीची इशारा पातळी ओलांडताच तात्काळ स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन केले. गतवर्षी पूर परिस्थीतीमध्ये अनेक सेवाभावी संस्था, नागरीकांनी सहकार्य केलेले आहे. त्याचप्रमाणे यावर्षीही संभाव्य पूर परिस्थीतीला सामोरे जाणेसाठी सर्वांच्या सहकार्य करावे असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com