हातकणंगलेत शाळा सुरू करण्याच्या हालचालींना वेग

ऋषीकेश राऊत
Wednesday, 6 January 2021

पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यासाठी संमतीपत्रासाठी सुरू असणारी शाळांची धडपड अंतिम टप्यात आली आहे. हातकणंगले तालुक्‍यात शहरी भागातील शाळांनी पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यासाठी अग्रेसर भूमिका दर्शवली आहे.

इचलकरंजी : पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यासाठी संमतीपत्रासाठी सुरू असणारी शाळांची धडपड अंतिम टप्यात आली आहे. हातकणंगले तालुक्‍यात शहरी भागातील शाळांनी पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यासाठी अग्रेसर भूमिका दर्शवली आहे. इचलकरंजी शहरातील सुमारे पाच शाळांनी पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू केले आहेत. मात्र ग्रामीण भागातून अद्याप प्रतिसाद नाही. आता शिक्षणाधिकाऱ्यांनी मुभा दिल्याने शाळा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर बहुतांश शाळांची तयारी पूर्ण झाली. त्यानंतर प्रत्येक शाळा पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यासाठी धडपडत आहेत. मात्र शासन निर्णय नसल्याने संमत्तीपत्राच्या कामात शाळांनी लक्ष केंद्रीत केले. परिपूर्ण तयारीने सज्ज झालेल्या शाळांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले. यामध्ये ग्रामीण शाळांची भूमिका मागे राहिली. पण शहरी शाळांचा ओघ अधिक राहिला.

ज्या शाळा पूर्व तयारीने सज्ज झाल्या आहेत अशा शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचे लेखी आदेश दिले. इचलकरंजी शहरातील अनुदानित व विनाअनुदानित अशा पाच शाळांनी पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू केले आहेत. संमत्तीपत्राच्या अटीखाली शाळा सुरू करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी मुभा दिली आहे. 

सध्या दोन सत्रात केवळ तीन तासासाठी पाचवी ते आठवीचे वर्ग भरत आहेत. संमत्तीपत्राच्या घाईगडबडीत असणाऱ्या सर्व शाळा येत्या दोन दिवसात सुरू करतील अशी चिन्हे दिसू लागली आहेत. संमपत्तीपत्राची अडचण ओळखून या कामात शिक्षक आधीपासूनच गुंतले आहेत. त्यामुळे माध्यमिक शाळांमध्ये कोरोनाच्या नियमाखाली पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू असल्याचे नियमीत चित्र पहायला मिळणार आहे. 

ग्रामीण भागात कसोटी 
नववी ते बारावीचे वर्ग सुरू करताना ग्रामीण भागात शाळांना खूप धडपडावे लागले. आजही या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या चिंतनीय आहे. आता पाचवी ते आठवीसाठी संमत्तीपत्राबरोबर विद्यार्थी संख्येसाठी शाळांना अधिक कष्ट पडणार आहेत. सर्वाधिक शाळा या ग्रामीण भागातील असल्याने सुरवातीचे काही दिवस शिक्षकांची कसोटी लागणार आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapuur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preparing To Start School In Hatkanangle Taluka Kolhapur Marathi News