आशिया खंडात नावाजलेल्या शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षपदी जी. डी. पाटील...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

शेतकरी सहकारी संघाच्या नूतन अध्यक्षपदी जी. डी. पाटील यांची बिनविरोध निवड झाली. शेतकरी संघाच्या मुख्य कार्यालयात श्री.मालगावे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली.

कोल्हापूर - आशिया खंडातील नावाजलेला शेतकरी सहकारी संघाच्या नूतन अध्यक्षपदी जी. डी. पाटील यांची बिनविरोध निवड झाली. शेतकरी संघाच्या मुख्य कार्यालयात श्री.मालगावे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली. निवड होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी.एन. पाटील व आमदार विनय कोरे यांनी बंद पाकिटात हे नाव दिले. त्यानंतर संघाच्या कार्यालयात याचे वाचन करण्यात आले.

शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षपदासाठी काल चार संचालकांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली होती. विद्यमान उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर, जी. डी. पाटील, राजू पाटील-टाकवडेकर व विनोद पाटील यांनी अध्यक्षपद मिळावे, अशी मागणी केली. दरम्यान, श्री मुश्रीफ आणि आमदार पी. एन. पाटील यांनी जी. डी. पाटील  यांना अध्यक्षपद देण्याचे निश्‍चित केले होते. आज त्यावर शिक्का मोर्तब झाला. आज श्री. मुश्रीफ यांच्या उपस्थितीत संघाच्या मुख्य कार्यालयात अध्यक्ष निवड झाली.

वाचा - चंद्रकांत पाटील यांना घरभर चिठ्ठ्या वाटतानाचा फोटो मी पाहिला : शरद पवार

जी. डी. पाटील यांच्याकडे मोठ्ठा अनुभव

 गेल्या अनेक वर्षापासून जी. डी. पाटील हे राष्ट्रावादी आणि काँग्रेस पक्षासाठी काम करत आहेत. तसेच त्यांच्याकडे असणाऱ्या संस्था चालविण्याचा अनुभव, कर्मचाऱ्यांना विश्‍वासात घेवून संघ वाढीसाठी फायदा होवू शकणार असल्याचे विचार करूनच जी. डी. पाटील यांना हे पद दिले गेले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: President of the Farmers Co-operative Association g d Patil