बेळगाव जिल्ह्यात तालुकास्तरावर खासगी कोविड रुग्णालये होणार सुरु

Private covid hospitals will be started in Belgaum district at taluka level
Private covid hospitals will be started in Belgaum district at taluka level

बेळगाव - कोविड उपचारासाठी अनेक खासगी रुग्णालये पुढे येत आहेत. वैद्यकीय सुविधांचा आढावा घेऊन अनुमती देण्यात यावी. प्रत्येक तालुक्‍यामध्ये किमान एक खासगी रुग्णालय स्थापण्यात यावे, अशी सूचना महिला आणि बाल कल्याण मंत्री शशिकला ज्वोल्ले यांनी केली. तसेच अतिवृष्टीमुळे संभाव्य पूरस्थितीची भिती आहे. त्यासाठी समन्वय वाढविला जावा, असेही त्यांनी सांगितले.

शासकीय विश्रामगृहात आज (ता.11) कोविड -19 आढावा आणि वैद्यकीय उपचाराचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जलद चाचण्या (रॅपीड टेस्ट) केल्या जाव्यात. कोणत्याही स्वरुपाची अडचण आल्यास पालकमंत्री वा माझ्याशी संपर्क साधला जावा. खासगी रुग्णालये कोविड उपचारासाठी पुढे येत आहेत. प्रशासनाने आढावा घेऊन निर्णय घ्यावे. खासगी रुग्णालयातील उपचाराचे दर ठरले आहेत. निपाणीला व्हेंटिलेटर पुरवावे. मनुष्यबळाची उणिव भासत असली तरी चांगला वैद्यकीय उपचार मिळणे जरुरी आहे, असे मंत्री ज्वोल्ले यांनी सांगितले.

 मंत्री ज्वोल्ले म्हणाल्या,"जिल्ह्यात अथणीसह विविध तालुक्‍यात खासगी रुग्णालये उपचारासाठी तयारी दाखवली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने पाहणी करून परवानगी द्यावी. खासगी रुग्णालयांना परवानगी मिळाल्यास सरकारी रुग्णालयांचा ताण कमी होईल. प्रत्येक तालुक्‍यात किमान एका खासगी रुग्णालयाला परवानगी द्यावी. पूरस्थिती नियंत्रणासाठीही नियोजन केले जावे. जलाशयातील पाणी पाण्याच्या विसर्गासाठी समन्वय ठेवावा.'' 

जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ म्हणाले,"कोरोनाबाधितांपैकी 40 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. तालुका कोविड केंद्रांनात सुविधा वाढविल्या आहेत. दररोज निश्‍चित उद्दिष्ठपेक्षा अधिक चाचण्या केल्या जात आहे. अत्यावश्‍यक परिस्थितीत सरकारी वैद्यकीय पथक खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. आयुष्यमान भारत आरोग्य कर्नाटक योजनेखाली 47 रुग्णालयांची निवड केली असून, निश्‍चित दरानुसार शुल्क आकारणी सुरु आहे. नियमावलीनुसार खासगी रुग्णालयांची निवड सुरु आहे. पुरात घरे पडलेल्यांना दोन दिवसांमध्ये राजीव गांधी आवास योजनेखाली पुढील हप्ते मिळतील.'' 

बीम्सचे वैद्यकीय संचालक विनय दास्तीकोप्प यांनी बीम्समध्ये 371 जण उपचार घेत असून, 32 व्हेंटिलेटर आहेत. कोरोनामुळे 96 जणांचा मृत्यू झाला आहे. पीपीई किट्‌स आणि मास्कची कमतरता नाही. पण, नर्सिंग कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. यामुळे निरंतर शिफ्टनिहाय कामकाज सुरु आहे. तसेच नर्सिंग कर्मचाऱ्यांची नियुक्ती सुरु आहे, अशी माहिती दिली आहे. कोविड-19 उपचारासाठी पुढे आलेल्या रुग्णालयांची पाहणी केली आहे. नियमानुसार सुविधा उपलब्ध असलेल्या रुग्णालयांना परवानगी देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी एस. व्ही. मुन्याळ यांनी दिली. 
जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, पाटबंधारे खात्याच्या उत्तर विभागाचे मुख्य अभियंता अरविंद कणगली, निवासी जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, कृषी विभागाचे उपसंचालक शिवणगौडा पाटील, जिल्हा दक्षता अधिकारी डॉ. तुक्कार आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com