
अभियांत्रिकीत प्रात्यक्षिक प्रभावशाली
डॉ. अरुण पाटील यांनी संशोधनातून केले सिद्ध
कोल्हापूर : बदलत्या काळात शिक्षणाच्या पद्धतीही बदलत आहेत. कालानुरूप व सुसंगत अशा शिक्षण पद्धतीचा अवलंब अनेक देश करतात. अभियांत्रिकी क्षेत्रातही अशाच पद्धतीच्या शिक्षणाविषयी संशोधन होत आहे. अभियांत्रिकीच्या बदलत्या शिक्षण पद्धतीत कोल्हापुरातील डॉ. अरुण पाटील यांनी नावलौकिक प्राप्त केला आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण चार भिंतींच्या आत देण्यापेक्षा प्रोजेक्ट अँड डिझाईन बेस्ड शिक्षण हे अधिक प्रभावशाली असल्याचे त्यांनी संशोधनात सिद्ध केले आहे. तसेच नामांकित विद्यापीठातून हे प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले आहे.
हेही वाचा- सोशल मिडियात चर्चेचा हलकल्लोळ,उमेदवारच कनफ्यूज
डॉ. पाटील हे कुरकली (ता. कागल) चे. शिवाजी विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स या विषयातून एमएस्सीचे शिक्षण घेतले. सांगली येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यायातील १० वर्षांच्या अध्यापनाच्या अनुभवानंतर त्यांना युनेस्कोने पीएचडीसाठी स्कॉलरशिप प्रदान केली. या स्कॉलरशिपवर त्यांनी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न मोनॅश विद्यापीठातून अभियांत्रिकी शिक्षण नेमक्या कोणत्या पद्धतीतून शिकवावे, तसेच ‘अभियांत्रिकी क्षेत्रातील शिक्षण पद्धतीतील बदल’ या विषयावर संशोधन केले.
ऑस्ट्रेलियासह एशिया आणि युरोपमधील काही देशांतील अभियांत्रिकी क्षेत्रातील शिक्षण देणाऱ्या विविध विद्यापीठांसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या संशोधनामुळे अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम कसा असावा आणि कसा अमलात आणावा, यासाठी विविध देशांत रोल मॉडेल उभे केले आहे.
डॉ. पाटील यांची इतर कामगिरी
सेंट्रल क्वीन्सलॅंड विद्यापीठाचे डेप्यूटी डीन पदावर काहीकाळ कार्यरत
ऑस्ट्रेलियातील डिकीन युनिव्हर्सिटीचे पदव्युत्तर विभागप्रमुख
अमिटी युनिव्हर्सिटीमध्ये कुलगुरू पदावर काहीकाळ कार्यरत
संपादन- अर्चना बनगे