esakal | Video धक्कादायक ; तंबाखू खाऊन शिक्षक देतो विद्यार्थ्यांना घाणेरड्या शिव्या; शिक्षकाविरोधात प्राध्यापिकेचे आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

protest against teacher of professor

दारवाड (ता. भुदरगड) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आनंदराव रजपूत, हे शाळेत तंबाखू खातात, विद्यार्थ्यांना घाणेरड्या शिव्या देतात, मुलांशी अर्वाच्य भाषेत बोलतात, याबद्दल 10 महिन्यापुर्वी तक्रार केली. मात्र शिक्षण विभागाने कसलीही कारवाई केलेली नाही.

Video धक्कादायक ; तंबाखू खाऊन शिक्षक देतो विद्यार्थ्यांना घाणेरड्या शिव्या; शिक्षकाविरोधात प्राध्यापिकेचे आंदोलन

sakal_logo
By
सदानंद पाटील

कोल्हापूर : दारवाड (ता. भुदरगड) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आनंदराव रजपूत, हे शाळेत तंबाखू खातात, विद्यार्थ्यांना घाणेरड्या शिव्या देतात, मुलांशी अर्वाच्य भाषेत बोलतात, याबद्दल 10 महिन्यापुर्वी तक्रार केली. मात्र शिक्षण विभागाने कसलीही कारवाई केलेली नाही. आता जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा देत दारवाडच्या उपसरपंच प्रा. डॉ. गितांजली पाटील यांनी मंगळवारी (ता. 25) जिल्हा परिषदेच्या आवारतच ठिय्या ठोकला. यावेळी शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी डॉ. पाटील यांची भेट घेत कारवाईचे पत्र दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

हे पण वाचा - तुळसमध्ये गव्याच्या हत्येचे गुढ कायम, चार गोळ्या घालून हत्या 

प्रा.डॉ.पा टील या एम.एस्सी. एम.एड.पीएच.डी. आहेत. शिवाजी विद्यापीठात त्या प्राध्यापक म्हणून काम करतात. दारवाड गावच्या त्या उपसरपंच म्हणून काम करत होत्या. नुकताच त्यांनी राजीनामा दिला आहे. दहा महिन्यापूर्वी त्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या होत्या. वर्गावर जावून मुलांचा अभ्यास घेण्याचा त्यांचा उद्देश होता. दरम्यान या वर्गावर असलेले सुरेश रजपूत हे शिक्षक विद्यार्थ्यांना शिव्या देत असल्याचे त्यांना आढळून आले. त्यांनी या सर्व गोष्टी रेकॉर्ड केल्या. तसेच वर्गावर जावून मुलांशी संवाद साधला. यावर मुलांनी रजपूत यांच्याविरोधात खूप तक्रारी केल्या. मुलींनी तर आश्रू ढाळल्याचे सांगत, सर्व रेकॉर्डींग डॉ. पाटील यांनी सभापती यादव यांना ऐकवली. 

हे पण वाचा - कर्जमाफीची दुसरी यादी शुक्रवारी... 

शाळेतील शिक्षकच तंबाखू खात आहेत. असे असताना तंबाखू मुक्‍त शाळेची घोषणा करताच कशी, अशी विचारणा पाटील यांनी शिक्षणाधिकारी उबाळे यांच्याकडे केली. तसेच या प्रक्रियेतील सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. सभापती यादव यांनी तात्काळ रजपूत याच्या सक्‍तीच्या रजेचे आदेश दिले. तसेच इतर अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस देण्याची सूचना करत या प्रकरणाची चौकशी आठ दिवसात करण्याची ग्वाही दिली.