आयुक्त साहेब परत या! डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या बदली विरोधात निदर्शने

Protest against transfer of Dr Mallinath Kalshetti in kolhapur
Protest against transfer of Dr Mallinath Kalshetti in kolhapur

कोल्हापूर - महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची अचानक बदली झाली. अजून काही महिने सेवा कार्यकाळ शिल्लक असताना एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची या प्रकारे बदली करण्यामागे कोणता हेतू असावा? असा प्रश्न सर्व कोल्हापूरकरांना पडला होता. याचेच पडसाद आज कोल्हापूर शहरात उमटले. 

कोल्हापुरातील नागरिकांनी छत्रपती शिवाजी चौक येथे उत्स्फूर्तपणे जमून डॉ. कलशेट्टी यांच्या बदली विरोधात निदर्शने केली. यावेळी 'आयुक्त साहेत्रब परत या, रंकाळ्याला तुमची गरज आहे, पंचगंगेला तुमची गरज आहे. कोल्हापूरला तुमची गरज आहे!' अशा प्रकारच्या घोषणांनी शिवाजी चौक दुमदुमला होता. 

यावेळी प्रशासनाच्या भूमीकेबद्दल  प्रश्नचिन्ह उपस्थित करत नागरिकांनी घोषणाबाजी केली. 'आयुक्तांची बदली करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो', 'आयुक्तांची बदली रद्द झालीच पाहिजे' अशा घोषणा नागरिकांनी दिल्या.

 'आयुक्त साहेब कम बॅक', 'कोल्हापूर लव्झ आयुक्त' अशा आशयाचे फलक झलकवण्यात येत होते.

 आयुक्तांनी लोकसहभागातून केलेले कार्य, सलग 75 आठवडे राबिवलेली स्वच्छता मोहीम, महापूर व कोरोना काळात केलेले व्यवस्थापन या सगळ्यामुळे आयुक्तांनी प्रत्येक कोल्हापूरकराच्या मनात एक आदराचे स्थान निर्माण केले होते. 

आयुक्तांनी आजपर्यंत केलेले कार्य दखलपात्र असताना त्यांची बदली करण्याचे काही एक कारण नाही. 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर प्रशासकीय धर्तीवर बदली करणे संयुक्तिक असते, परंतु अशाप्रकारे आधी पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे आणि आता आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांची बदली केल्यामुळे असे कर्तव्यदक्ष अधिकारी शासनाला का नको आहेत? असा प्रश्न कोल्हापूरकरांना पडला आहे. 

यावेळी संदीप देसाई, गिरीश फोंडे, निलेश रेडेकर, उत्तम पाटील, गीता हसुरकर, अमरजा पाटील, सूरज सुर्वे, रुपेश पाटील, अमोल बुड्डे, मोईन मोकशी,  लखन काझी, संपदा मुळेकर, गीता डोंबे, अवधूत भाटे, संजय साडविलकर, नीता पडळकर, रसिका गोळे, संतोष घाटगे, पंकज खोत, राज कोरगावकर, प्रथमेश सूर्यवंशी, गणेश लाड, महेश घोलप, विशाल वठारे, धैर्यशील शिंदे, यशवंत शिंदे, लाला भोसले, गिरीश पाटील, कार्तिक वडर आदी उपस्थित होते.

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com