'अधिकारी नसतील तर कार्यालय बंद ठेवा' ; ग्रामस्थांचे महावितरणसमोर आंदोलन

protest of village people on MSEDCL kolhapur for increased electricity bill
protest of village people on MSEDCL kolhapur for increased electricity bill
Updated on

कोल्हापूर : अधिकारी नसतील तर महावितरणचे कार्यालय बंद ठेवा, असा इशारा देत पट्टणकोडोली समस्त ग्रामस्थ वीज बिल कृती समितीतर्फे महावितरणच्या ताराबाई पार्कातील मुख्य कार्यालयाच्या इमारतीला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना त्यांना वेळीच रोखल्यानंतर समितीने अधिकार्‍यांवर संताप व्यक्त केला.

यावेळी निवास साळोखे म्हणाले, 'मुख्य अभियंता सुधाकर निर्मळे यांच्याकडे भेटण्याची वेळ मागितली होती. त्यांनी मुंबईला जाणार असल्याने भेट होणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यानंतर अधीक्षक अभियंता अंकूर नाळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आज भेटण्याचे कळविले होते. मात्र, ते कार्यालयात हजर नाहीत. कार्यालयात अधिकारीच नसतील तर कार्यालय उघडे कशासाठी ठेवायचे? वीज ग्राहकांनी न्याय कोणाकडे मागायचा? असा प्रश्न तयार होतो.' त्यानंतर बाबा पार्टे यांनी दरवाजाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखले.

त्यानंतर कार्यकारी अभियंता प्रशासन नरेंद्र ताडे  शिष्टमंडळाला भेटण्यासाठी आले. मात्र, शिष्टमंडळाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून चर्चा करण्याचा पवित्रा घेतला. ताडे यांनी अधिकारी हजर नसल्याने सोमवारी (ता. १५) समितीला बैठकीसाठी बोलविण्याचे आश्वासन दिले. आंदोलनात दुर्गेश लिंग्रस, धनगोंडा पाटील, अरविंद आवटे, मलगोंडा पाटील, कुमार मेहरे, देवगोंडा अवघडे, दत्तात्रय बोरगावे, भागोजी डावरे, विठ्ठल बेमटे, अजय गुरव सहभागी झाले होते.

पट्टणकोडोलीचे ग्रामस्थ कोल्हापुरातील वीज बिल भरणार नाही कृती समितीने जाहीर केलेल्या वीज बिल माफ करावे, मताशी सहमत आहेत. ग्रामस्थांची आर्थिक घडी पूर्णतः बिघडली असल्याने वीज बिल भरणे शक्य नाही. वीज पुरवठा बंद करण्याची कारवाई झाल्यास त्याला कडाडून विरोध केला जाईल. कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरणची राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com