कोल्हापूर थरार; "फायरिंग तो हमारे लिए कुछ नयी बात नहीं

firing is simple thing say 007 gang leader
firing is simple thing say 007 gang leader

कोल्हापूर -  "फायरिंग तो हमारे लिए कुछ नयी बात नहीं, हमेने तो राजस्थान पोलिस समज कर फायरिंग की' अशी कबुली 007 गॅंगचा म्होरक्‍या संशयित शामलाल पुनिया याने चौकशीत दिल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. 

किणी टोलनाक्‍यावर राजस्थानातील गुंडाना पकडण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी मंगळवारी (ता.28) रात्री सापळा रचला. संशयितांची नंबर प्लेट नसलेली पांढऱ्या रंगाची मोटार तेथे आली. त्यांना थांबविण्यचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र, ते थांबले नाहीत. त्यांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर थेट त्यांनी रिव्हॉल्वरमधून गोळीबार केला. त्याला पोलिसांनी चोखपणे उत्तर देत तिघाही गुंडाना ताब्यात घेतले. त्यातील श्‍यामलालसह दोघे जण जखमी झाले. सीपीआरमध्ये त्यांना दाखल केले. त्यांच्याकडे पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली. त्यात बिश्‍णोई गॅगचा म्होरक्‍या शामलाल पुनिया याला टोल नाक्‍यावर पोलिस असल्याचे सांगूनही का थांबला नाहीत, थेट पोलिसांवर गोळीबार कसा केला याबाबतची विचारणा पोलिसांनी केली. त्यात त्याने "फायरिंग तो हमारे लिए कुछ नयी बात नहीं, हमें लगा की राजस्थान पोलिस हमें पकडणे आई है, इसलिए हमनें आपको विरोध किया, और आपके उपर फायरिंग की' अशी कबुली दिली. या टोळीकडून भारतीय बनावटीची मात्र चांगली फिनिशींग केलेली रिव्हॉल्वर व जिंवत मॅगझिन जप्त करण्यात आल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. ही गॅंग रिव्हॉल्वरचा दहशतीसाठी सहजपणे वापर करते. त्याचे व्हिडीओ बनवून ते सोशल मिडीयावर व्हायरल करून वचक निर्माण करते अशा धक्कादायक गोष्टी तपासात पुढे येत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

सोशल मीडियावरही झकळते गॅंग 
टोळीने 007 अशी गॅंग तयार केली. दशहतीसाठी रिव्हॉल्वरसारखी शस्त्रे खरेदी केली. त्याचा बिनधास्त वापर करून व्हिडीओ तयार केले. ते व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केले. असे व्हिडीओ सध्या राजस्थानसह इतर राज्यातही चांगलेच चर्चेत आहेत. हे व्हिडीओ पाहून अनेक तरूण या टोळीकडे आकर्षित होत आहेत. राज्यस्थान येथील गोळीबार प्रकरणात हे शामलाल पुनियासह त्याचे दोघे साथिदार पसार झाले होते असे जोथपूर (राजस्थान) पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नरेंद्र पुनिया यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com