सकाळ ब्रेकिंग ; कोल्हापूर शहरात गुरूवारपासून जनता कर्फ्यु?

Public curfew in Kolhapur city from Thursday
Public curfew in Kolhapur city from Thursday

कोल्हापूर - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यापाठोपाठ कोल्हापूर शहरातही 10 ते 16 सप्टेंबर या कालावधीत जनता कर्फ्यु पुकारण्यात येणार आहे. यासाठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या नेतृत्त्वाखाली व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतला असून यासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्यासाठी आज (ता. 8) सायंकाळी इंजिनिअरींग असोशिएनच्या बैठकीत व्यापारी असोशिएशनची बैठक बोलवण्यात आली आहे.


जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाचा कहरच सुरू आहे. रोज किमान 700 ते 800 नवे कोरोना रूग्ण सापडत आहेत. यावरून जिल्ह्यात समुह संसर्ग सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढत आहे. एकीकडे कोरोनाचा जिल्ह्याला विळखा पडत असताना नागरिकांकडून मात्र योग्य ती खबरदारी घेत नसल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सहा तालुके आणि दोन नगरपालिका हद्दीत यापूर्वीच जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आला आहे. पण शहरात यासंदर्भातील निर्णय घेण्यात व्यापारी वर्गाचा मोठा अडथळा होता. तथापि आता व्यापाऱ्यांनी कोरोना संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यु पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या नेतृत्त्वाखाली काम करणाऱ्या सर्व व्यापारी संघटना यासाठी एकवटल्या असून यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आज (ता. 8) सायंकाळी पाच वाजता उद्यमनगर येथील इंजिनिअरींग असोशिएशनच्या सभागृहात बोलवण्यात आली आहे. या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल. त्यात कोणत्या अत्यावश्‍यक सेवा सुरू ठेवायच्या आणइ कोणत्या बंद ठेवायच्या यासह व्यापाऱ्यांसाठी कोरोनाचा संसर्ग कमी होईपर्यंतची नियमावलीही तयार केली जाणार आहे.

सद्या शहर आणि जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सहा तालुक्‍यात हा संसर्ग तोडण्यासाठी जनता कर्फ्यु पुकारण्यात आला आहे. त्याच धर्तीवर शहरातही 10 सप्टेंबरपासून किमान सहा दिवस जनता कर्फ्यु पुकारण्याचे नियोजन आहे. आज होणाऱ्या बैठकीत यावर निर्णय होईल. 

-संजय शेटे, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com