बेळगाव जिल्हा परत स्तब्ध...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 May 2020

जनता कर्फ्यूला प्रतिसाद ; निर्मनुष्य रस्ते, ठप्प दैनंदिन व्यवहार

बेळगाव - कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी आज (ता.24) घोषित जनता कर्फ्यूला बेळगाव जिल्ह्यात आणि शहरात व्यापक प्रतिसाद मिळाला. जनजीवन स्तब्ध झाले. तर, दैनंदिन व्यवहार बंद आहे. यामुळे परत 22 मार्च रोजी घोषित कर्फ्यू आणि त्यानंतरही जारी लॉकडाऊनची आठवण ताजी झाली. दरम्यान, अत्यावश्‍यक सेवा सुरु होत्या.

वाचा - अन् चक्क बैलगाडीतून निघाली लग्नाची वरात.... 

चौथ्या लॉकडाऊनची घोषणा करताना विविध नियम शिथिल केले. परराज्य प्रवाशांसाठी मार्ग खुले केले. परिणामी कोरोनाबाधितांचा आकडा वाढला. त्यासाठी कर्नाटकात आज जनता कर्फ्यू आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच व्यवहार बंद आहेत. खासगी, सरकारी वाहतूक बंद आहे. रेल्वे धावल्या नाही. दैनंदिन कामकाज बंद आहे. शहरातील सर्वच रस्ते निर्मुनष्य आहेत. पोलिसांचा बंदोबस्त वाढविला आहे. यामुळे लोक घरीच थांबणे आज पसंद केले आहे. संडे एन्जॉय केला. सील डाऊन घोषित करण्यात येऊनही काही जण बाहेर पडल्याची आढळून आले. त्यांना पोलिसांचा प्रसाद मिळाला. निम्म्यावरून माघार पाठविले. पण, दूध विक्रेते, मेडिकल, दवाखाने, मेडिकल स्टॉफ आणि पॅरामेडिकल स्टाफला सूट देण्यात आली होती. ओळखपत्र दाखविल्यानंतर कर्मचाऱ्यांना जाऊ दिले. पेट्रोल पंप आज सकाळी सुरु होती. पण, दुपारी त्यांना बंद पाडण्यास भाग पाडले.

पुढील रविवारीही सील डाऊन

लालपट्टा वगळता उर्वरित ठिकाणी व्यवहार सुरळीत झाले आहेत. सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत कामकाज सुरु आहे. अर्थचक्राला परत पूर्वपदावर आणण्याचे नियोजन आहे. बळ मिळत आहे. पण, दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. अवघ्या आठवड्यात कोरोना पॉझिटिव्हची संख्या राज्यात 2 हजारच्या उंरड्यावर पोचली आहे. त्यासाठी जनता कर्फ्यू घोषित करत सील डाऊन जारी केले आहे. पुढील रविवारी (ता.31) सील डाऊन कायम राहणार आहे. शनिवारी सायंकाळी 7 वाजता सीलडाऊनला सुरवात होईल. सोमवारी सकाळी नियम शिथिल केले जातील, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The public curfew to reduce the impact of corona received a wide response in Belgaum district and city