
वधु वराची बैलगाडीतुन काढण्यात आलेली मिरवणुक.तोंडाला मास्क लावुन बैलगाडीत बसलेल्या वधु वराला ग्रामस्थ घरातुन आशिर्वाद देत होते.
बेळगाव - लग्न समारंभ म्हणजे बॅन्ड बाजा, पै पाहुण्यांची लगबग हे चित्र नेहमीच पण लॉकडाऊन काळातील लग्न समारंभामध्ये अनेक गोष्टींना फाटा देत कमी खर्चात लग्न समारंभ आयोजित करण्याकडे अनेकांनी लक्ष दिले आहे. त्यामुळेच लग्न समारंभ काही तासात पुर्ण होत असल्याचे चित्र गावागावांमध्ये पहावयास मिळत असुन रविवारी मंडोळी येथे आयोजित करण्यात आलेल्या लग्न कार्यावेळी नव वधु वराची सजवलेल्या बैलगाडीतुन काढण्यात आलेली मिरवणुक सर्वांच्याच आकर्षनाचा केंद्रबिंदु ठरली. तसेच पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याचे मत ग्रामस्थांमधुन व्यक्त होत आहे.
परंपरा जपण्याचा प्रयत्न
शहरापासुन दहा किलो मिटर अंतरावर असलेल्या मंडोळी येथे मंगेश यल्लाप्पा दळवी व वाघवडे येथील विद्या मारुती पाटील यांचा लग्न समारंभ पार पडला.यावेळी सामाजिक अंतर राखीत 50 पै पाहुण्यांच्या उपस्थितीत सकाळी 9 वाजता अक्षता टाकण्यात आल्या, मात्र यावेळी लक्षवेधी ठरली ती वधु वराची बैलगाडीतुन काढण्यात आलेली मिरवणुक.तोंडाला मास्क लावुन बैलगाडीत बसलेल्या वधु वराला ग्रामस्थ घरातुन आशिर्वाद देत होते. लॉकडाऊनमुळे मनात इच्छा असुनही लग्नाला अधिक, लोकांना बोलविता येत नाही. अशा वेळी बैलगाडीतुन काढुन परंपरा जपण्याचा प्रयत्न दळवी कुटुंबाने केला आहे.
वाचा - शिरखुर्मा : रमजान ईदचा खास मेन्यू
लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो मात्र लॉकडाऊन काळात कमी खर्चात होत असलेल्या लग्न कार्याचे सर्वच स्तरातुन कौतुक होत असुन लग्न कार्यात सर्वांनाच मोठ्या प्रमाणात खर्च करता येत नाही. अशावेळी अतिरिक्त खर्च टाळुन लग्न केल्यास कोणालाही त्रास होणार नाही याची असे मत व्यक्त होऊ लागले आहे.
लॉकडाऊन काळात आयोजित करण्यात येत असलेल्या लग्न कार्यावेळी खर्च कमी येत आहे, अशाच प्रकारे येणाऱ्या काळातही लग्न कार्य कमी खर्चात करण्यावर भर दिला तर कोणत्याही कुटुंबावर आर्थिक भार पडणार नाही याची दखल घेणे आवश्यक आहे. बैलगाडीतुन काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे सर्वांनीच कौतुक केले
- संतोष पाटील, मंडोळी