
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन
कोल्हापूर : बॉलिवूडसाठी मुंबईमध्ये ज्या सुविधा आहेत. त्या देशात अन्यत्र नाहीत. त्यामुळे मुंबईमधून बॉलिवूड कोणीही हलवू शकणार नाही. असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
येथील महाराष्ट्र हायस्कूल मध्ये जाऊन त्यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बॉलिवूड उत्तर प्रदेश मध्ये घेऊन जाणार असे म्हणाले होते. आज त्यांचा मुंबई दौरा आहे. याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, वर्षानुवर्षे चित्रपट निर्मिती मुंबईमध्ये होत आहे. त्यासाठी आवश्यक असणारी सर्व साधने, कलाकार, कारागीर, स्टुडिओ मुंबईमध्ये विकसित झाले आहेत. ज्या सुविधा बॉलिवूडला आवश्यक आहेत, त्या सर्व मुंबईत उपलब्ध आहेत. त्यामुळे मुंबईतून बॉलिवूड कोणीही हलवू शकणार नाही.
हेही वाचा- नवा ट्रेंड: कलाकुसरीचा मॉडर्न लूक! -
योगी आदित्यनाथ बॉलिवूड च्या धरतीवर उत्तर प्रदेश मध्ये चित्रपट निर्मिती व्यवसाय सुरू करू शकतील. त्याचा अभ्यास करण्यासाठी कदाचित ते आले असावेत.राज्यातील सर्व विधान परिषद जागा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जिंकतील. विधान परिषदेमध्ये भाजप बहुमताच्या जवळ पोहोचेल. असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
संपादन- अर्चना बनगे