Kolhapur Election Update: शिक्षक मतदारसंघात चुरशीने मतदान; चार तासात 43 टक्के मतदान

निवास चौगले
Tuesday, 1 December 2020

मतदानाची सविस्तर आकडेवारी अहवाल

कोल्हापूर : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठी कोल्हापूर जिल्ह्यात मतदानास  सकाळपासूनच  उत्साहात सुरवात झाली.  अनेक मतदान केंद्रावर गर्दी दिसून येत आहे. आज  सकाळी दहा वाजेपर्यत 18.22 टक्के  शिक्षक मतदारसंघाचे मतदाना झाले.तर पदवीधर मतदारसंघात 11.75  टक्के मतदान झाले होते. त्यानंतरही शिक्षक  मतदारसंघात उत्साह कायम होता.आज  दुपारी बारा पर्यत शिक्षक मतदारसंघात 43.12  टक्के .तर पदवीधर मतदारसंघात 28.36 टक्के मतदान झाले. 

मतदानाची सविस्तर आकडेवारी पुढीलप्रमाणे

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ

जिल्हा : कोल्हापूर 

पदवीधर मतदार संघ मतदान
(एकूण मतदान केंद्रे: २०५)
पुरुष पदवीधर मतदार: ६२७०९
स्त्री पदवीधर मतदार: २६८२०
एकूण पदवीधर मतदार: ८९५२९
सकाळी ८ ते १२ या कालावधीत  झालेले मतदान
पुरुष: १९८८२
स्त्री :५५०९
एकूण :२५३९१
 मतदान टक्केवारी : २८.३६%

शिक्षक मतदार संघ मतदान (एकूण मतदान केंद्रे: ७६)
पुरुष शिक्षक मतदार: ८८७९
स्त्री शिक्षक मतदार :३३५८
एकूण शिक्षक मतदार: १२२३७
सकाळी ८ ते १२ कालावधीत झालेले मतदान
पुरुष:४१७५
स्त्री : ११०२
एकूण : ५२७७
 मतदान टक्केवारी:४३.१२ %

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune division graduate teachers legislative council constituency voting update