
मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे, शांततेत आणि नि:पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत.
कोल्हापूर - पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाच्या मतमोजणीसाठी जाण्याआधी म्हणजे सकाळी तांबडं फुटायलाच (सूर्योदयलाच) शिक्षक मतदार संघातील उमेदवार जयंत आसगावकर (कोल्हापूर) यांच्यासोबत समर्थकांनी गुलाल लावून विजय उत्सव साजरा करूनच मतमोजणी केंद्रावर दाखल झाले.
हे पण वाचा - हातरूमालाची मागणी करत, तोतया पोलिसाने निवृत्त शिक्षकाला घातला गंडा
पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुल येथे मतमोजणी होत आहे . शिक्षक मतदार संघासाठी 42 टेबल वरती मतमोजणी होईल. प्रत्येक फेरीत तेराशे मतदान मोजले जातील. मतमोजणीचा अधिकृत निकाल डिसेंबरला पहाटे जाहीर होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी शिक्षक मतदार संघातील कॉंग्रेसचे उमेदवार जयंत आसगावकर (कोल्हापूर) यांनी आज सकाळी मतमोजणी केंद्रात जाण्याआधीच त्यांच्या समर्थकांनी एकमेकांना गुलाल लावत तासगावकर यांचा जयघोष केला. रात्री उशिरापर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती आणि कसे मतदान झाले, याची गोळाबेरीज करणारे समर्थक आज पहाटे ही लवकर उठले. दरम्यान गेल्या महिनाभर सुरू असलेला प्रचाराचा धडाका. त्याला मिळणारा चांगला प्रतिसाद यामुळे आसगावकऱ्यांच्या समर्थकांना विजयाची खात्री वाटू लागली आहे. त्यामुळेच त्यांनी आज सुर्योदयालाच जयंत आसगावकर यांच्या जयघोष करत विजय उत्सव साजरा केला.
संपादन - धनाजी सुर्वे