
कोल्हापूर : बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी तरूणास न्यायालयाने दोषी ठरवले. त्याला एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. अमर आण्णाप्पा वडर (रा. सावर्डे, ता. हातणंगले) असे त्याचे नाव आहे. सरकारपक्षातर्फे ऍड. पी. जे. जाधव यांनी काम पाहीले.
जिल्ह्यातील एक अल्पवयिन मुलगी 15 ऑगस्ट 2017 ला घरी जात होती. त्यावेळी अमर वडरने तिला अडवून तिच्याशी गैरवर्तन केले. त्याला पिडीत मुलीने प्रतिकार केला. त्यावेळी त्याने तिला शिवीगाळ करून मारहाण करून धमकी दिली. याबाबत पेठवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबतचा तपास हेड कॉन्स्टेबल एम. बी. मेतके यांनी केला. या खटल्याचे काम जिल्हा व सत्र न्यायाधिश (वर्ग 2) एस. आर. पाटील यांच्या न्यायालयात सुरू झाले.
सरकारपक्षातर्फे ऍड. प्रतिभा जे. जाधव यांनी बाजू मांडली. त्यांनी सात साक्षीदार तपासले. न्यायाधिशांनी दोन्ही बाजूचा युक्तीवादानंतर अमर वडरला दोषी ठरवले. त्याला एक वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याकामात सरकारपक्षाला उपनिरीक्षक बी. बी. सुर्यवंशी, कर्मचारी एस. बी. मेतके, मिलींद टेळी यांची मदत मिळाली.
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.