
लहान मुलांसाठी हळद सुरक्षित आहे. कोमट पाणी, दुधातून दिले तर बाळाचे आरोग्य सुधारते.
कोल्हापूर : कोरोना लॉकडाउनच्या सहा महिन्यांच्या काळात (मार्च ते सप्टेंबर) भारतातील काही नामवंत कंपन्यांनी हळदीचा वापर करून अनेक उत्पादने बाजारात ‘लाँच’ केली आहेत. यात आईस्क्रीमपासून ते सॅनिटायझरपर्यंतचा समावेश आहे. भारतीयांच्या आहारात दररोज चिमूटभर हळदीचा वापर होतो; पण इम्युनिटी बुस्ट म्हणून ही नवी उत्पादने बाजारात आली आहेत.
सॅनिटायझर्स, डिसइन्फेक्टंटस्, साबण, जेम्स् प्रोटेक्शन्स्, बिव्हरेजिस्, इम्युनिटी किटस्, हॅन्ड ॲन्ड एअर सॅनिटायझर्स, हळदी आईस्क्रिम, हळदी-जिंजर-मिल्क, हनी टरमरिक मिल्क, अँटी जेम् डिटर्जन्टस्, फॅब्रिक कंडिशनर्स, लोशन्स्.
हळदीचे गुण
रोगप्रतिकारक क्षमता, रक्त शुद्ध, त्वचेचा रंग उजळणे, जंतुनाशक
हृदविकार, मधुमेह, कर्करोग, मेंदुचे विकारास प्रतिबंध
पचनक्रिया सुधारते, जखमेमधून रक्तस्त्राव बंद करण्यास उपयुक्त
हेही वाचा- कोरोना संकटांचा डोंगर, तरीही ताठ मानेने जगायचं आहे
हळदीमध्ये कुरकुमिन या महत्त्वाच्या घटकाचे प्रमाण १ ते १२ टक्केपर्यंत असते. कुरकुमिनमुळे हळदीला महत्त्व आले. पचनक्रिया सुधारते. हळदीत ॲन्टीसेप्टीक प्रापॅर्टीज असतात. सुज कमी होते. लहान मुलांसाठी हळद सुरक्षित आहे. कोमट पाणी, दुधातून दिले तर बाळाचे आरोग्य सुधारते.
-सौ. भाग्यश्री फरांदे, कृषी उपसंचालक
संपादन - अर्चना बनगे