क्‍वारंटाईन झालेला परशराम रमला बाग कामात

सुनील कोंडुसकर
Thursday, 23 April 2020

किणी (ता. चंदगड) येथील शाळेत क्‍वारंटाईन केलेल्या परशराम ताशीलदार या तरुणाने दिवसभर शालेय बगिचा आणि पटांगण स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. गेल्या काही दिवसात त्याच्या या कामामुळे तेथील स्वच्छता आणि बगिचा लक्ष वेधून घेत आहे.

चंदगड,: किणी (ता. चंदगड) येथील शाळेत क्‍वारंटाईन केलेल्या परशराम ताशीलदार या तरुणाने दिवसभर शालेय बगिचा आणि पटांगण स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. गेल्या काही दिवसात त्याच्या या कामामुळे तेथील स्वच्छता आणि बगिचा लक्ष वेधून घेत आहे.

शहरातून गावाकडे आलेल्या परशराम याला स्थानिक दक्षता समितीने क्‍वारंटाईन होण्याची सूचना दिली. त्याला संस्थात्मक क्‍वारंटाईन करण्यात आले. त्यासाठी गावच्या शाळेत व्यवस्था करण्यात आली. दिवसभर मोठा वेळ उपलब्ध असताना मोबाईलच्या माध्यमातून मनोरंजन करण्यापेक्षा हाच वेळ सत्कारणी लावावा असा निर्धार करुन त्याने शाळेचे पटांगण स्वच्छता करण्यास सुरवात केली.

बगिचाचीही देखभाल सुरू केली. बगिचातील झाडांची खुरपणी करून त्यांना तो दररोज पाणी घालतो. यामुळे कडक उन्हाळा असतानाही बगिचातील झाडे तजेलदार वाटत आहेत. पटांगण स्वच्छतेमुळे शालेय परिसर शांत, रमणीय झाला आहे. त्याच्या या कामाचे ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Quarantine Parasharam Engage In Garden Work Kolhapur Marathi News