भांडणात मध्यस्थी केली आणि अंगलट आली

सचिन शिंदे
Tuesday, 15 September 2020

भांडण्यात मध्यस्थी केल्याच्या रागातून केलेल्या चाकू हल्ल्यात येथील युवक गंभीर जखमी झाला. बिरू धुळा लाली (वय 23) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी हुपरी पोलिसांनी सोैरभ बाबासो चपरे व कार्तिक उर्फ सोन्या बाबासो चपरे (दोघेही पट्टणकोडोली) यांना अटक केली.

पट्टणकोडोली ः भांडण्यात मध्यस्थी केल्याच्या रागातून केलेल्या चाकू हल्ल्यात येथील युवक गंभीर जखमी झाला. बिरू धुळा लाली (वय 23) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी हुपरी पोलिसांनी सोैरभ बाबासो चपरे व कार्तिक उर्फ सोन्या बाबासो चपरे (दोघेही पट्टणकोडोली) यांना अटक केली.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, बिरु लाली व साताप्पा चपरे रविवारी रात्री हुपरी-पट्टणकोडोली रस्त्यावरील हेरवाडे गॅरेजसमोर चपरे व लाली यांच्यात झालेल्या भांडणाबाबत चर्चा करत थांबले होते. या वेळी सौरभ व कार्तिक चपरे यांनी लाली यास आमच्या भांडणात तू कोण सांगणार म्हणून मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी सौरभ चपरे याने बिरू लाली याच्यावर चाकूने हल्ला केला. यात लाली गंभीर जखमी झाला. घटनेची नोंद हुपरी पोलिसांत झाली असून तपास हवालदार सचिन सावंत करत आहेत.

शस्त्र खरेदी ऑनलाईन 
सौरभच्या मित्राने चाकू व तलवार ऑनलाईन खरेदी केल्याची माहिती समोर आली असून यांमुळे पोलिसांसमोर आव्हान आहे. याव्यतिरिक्त आणखी कांही हत्यारे युवकांनी खरदी केली आहेत काय याचा शोध पोलिस घेणार काय अशी चर्चा आहे. 

संपादन ः रंगराव हिर्डेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The quarrel was mediated and Anglat came

Tags
टॉपिकस
Topic Tags: