हातकणंगले परिसरात 'ही' तल्लफ भागवण्यासाठी पहाटेपासूनच केली जातेय गर्दी...

Queues from early morning to buy mawa in Hatkanangle
Queues from early morning to buy mawa in Hatkanangle
Updated on

हातकणंगले - जिल्ह्यात लॉकडाउनची कडक अंमलबजावणी सुरू आहे. परंतू मावा विक्रीवर मात्र याचा परिणाम दिसत नाही. हातकणंगले परिसरात राजरोसपणे मोठ्या प्रमाणांत मावा विकला जात आहे. यातून रोज लाखो रुपयांची उलाढाल सुरू आहे. पहाटेपासूनच मावा खरेदीसाठी गर्दी होत आहे. अनेक गावांतील युवकांच्या रांगा हातकणंगलेत लागत असल्याने 'खायला मावा हातकणंगलेत येवा' असं काहीसं गमतीनं बोललं जाऊ लागलं आहे.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासन, पोलिस व आरोग्य यंत्रणा रात्रीचा दिवस करीत आहे. देशभरात लॉकडाउनचे अनुकरण होत असताना मावाप्रेमी मात्र 'तल्लफ' भागवण्यासाठी पहाटेपासूनच पानपट्टीमालकाच्या दारात गर्दी करीत आहेत. दिवसभराचा "स्टॉक' सकाळीच करुन दिवसभर मावा चघळून सार्वजानिक ठिकाणी पिचकाऱ्या मारताना दिसत आहेत. गुटख्यांच्या पुड्यांची अज्ञात ठिकाणी डिलिव्हरी दिली जात आहे. यावेळी आठवड्याचा स्टॉक करुन ठेवण्यात येत आहे. एरव्ही दिवसभरात होणारी विक्री वाढ झाली असून मावाप्रेमी निवांत असल्यामुळे त्यांच्या संख्येतही वाढ झालेली आहे. चोरुन खाणाऱ्यांची मात्र पंचायत झाली असून दिवसभर घरातच असल्याने मावा चघळण्यासाठी आडोशाचा आधार घ्यावा लागत आहे.

शंभरचा मावा, दिवसभर खावा

पूर्वी पानपट्टी दिवसभर सुरु असल्याने हवा तेवढाच मावा घेतला जात होता. आता लॉकडाउनमुळे एकाचवेळी दिवसाचा स्टॉक घेतला जातो. त्यामुळे ठराविक वेळी खाण्यात येणारा मावा, स्टॉक असल्याने दिवसभर चघळत असताना मावाप्रेमी दिसत आहेत.  

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur flood situation latest
Bay of Bengal Weather System Maharashtra Rain Alert
Panhala Police Act Swiftly After Huge Tree Falls Across Main Road
Kolhapur farmers oppose expressway project
Marathi News Esakal
www.esakal.com