आर. के. नगर ओढ्याची रूंदी झाली कमी 

R. K. The width of the city stream decreased
R. K. The width of the city stream decreased
Updated on

कोल्हापूर :  आर. के. नगर येथील ओढ्याचे पात्र अनेक ठिकाणी अरुंद झाले आहे. काही ठिकाणी ओढ्याच्या पात्रात कचरा टाकला जातो. ओढ्याचे मूळ पात्र वळवण्याचा प्रयत्नही झाला असून, यामुळे पावसाळ्यात पाणी पात्राबाहेर पडते. गेल्या वर्षी येथील घरांच्या अंगणात ओढ्याचे पाणी आले होते. हा ओढा नैसर्गिक असून, त्याचे संवर्धन करण्याची आवश्‍यकता आहे. 

चित्रनगरी टेकडीच्या भारती विद्यापीठ महाविद्यालयाच्या बाजूला या ओढ्याचा उगम होतो. तेथून म्हाडा कॉलनी, राजेंद्रनगरच्या मागच्या बाजूने हा ओढा "ऍस्टर आधार'च्या समोरून जातो. पुढे त्याला एस.एस.सी. बोर्डकडून आलेला ओढा मिळतो व एक स्वतंत्र प्रवाह तयार होतो. हा प्रवाह पुढे जयंती नाल्याला मिळतो. चित्रनगरीची टेकडी, आर. के. नगरचा माळ, कृषी संशोधन केंद्राचा माळ (जेथे आता वृक्षलागवड झाली आहे) या सर्व भागातील पावसाचे पाणी येऊन मिळते. पूर्वी जून ते ऑक्‍टोबर ओढ्यात पाणी असायचे. 

या ओढ्यात मोरेवाडी गावातील म्हशी धुतल्या जायच्या. ओढ्याचे पात्र पाच ते आठ फूट रुंद होते. पावसाळ्यात पाणी वाढले की ओढ्यावरील पूल पाण्याखाली जायचा. मात्र, जशी येथे वस्ती वाढत गेली तसे ओढ्याचे रूपांतर आता नाल्यात झाले आहे. काही ठिकाणी ओढ्याचे पात्र अरुंद केले गेले, तर काही ठिकाणी नैसर्गिक पात्र चर मारून बदलण्याचाही प्रयत्न झाला. यामुळे पावसाळ्यात ओढ्याचे पाणी आसपासच्या घरांच्या अंगणात आले.

ग्रामपंचायत गाळ काढून पात्राची खोली वाढवण्याचे काम करते; पण ओढ्याची रुंदीच कमी झाल्याने पावसाळ्यात अतिरिक्त पाणी परिसरात पसरते. काही ठिकाणी ओढ्याच्या पात्रात कचराही टाकला जातो. सांडपाणी सोडले जाते. हा पाण्याचा नैसर्गिक स्रोत असून, त्यामुळे या परिसरातील भूजलपातळी टिकून आहे. यासाठी ओढ्याचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. 

आर. के. नगरमधील नैसर्गिक ओढ्याचे आता नाल्यात रूपांतर होत आहे. ओढ्याच्या पात्राची रुंदी कमी होत गेली तर पावसाळ्यात आसपासच्या घरांत पाणी जाऊन नुकसान होईल. यासाठी ओढ्याचे संवर्धन करणे आवश्‍यक आहे. 
- विकी मोरे, नागरिक 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com