करवीर पोलिस उपाधीक्षकपदी आर. आर. पाटील यांची नियुक्ती

राजेश मोरे
Friday, 22 January 2021

आर. आर. पाटील यांनी याआधी कोल्हापुरात शहर वाहतूक शाखेत तत्कालीन पोलिस निरीक्षकपदी कर्तव्य बजावले

कोल्हापूर  : करवीर पोलिस उप अधीक्षकक्षपदी आर. आर. पाटील यांची नियुक्ती झाली आहे. उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांची पिंपरी-चिंचवडला सहाय्यक पोलिस आयुक्तपदी बदली झाली. गृह खात्याकडून आज या बदलीचे आदेश प्राप्त झाले.

आर. आर. पाटील यांनी याआधी कोल्हापुरात शहर वाहतूक शाखेत तत्कालीन पोलिस निरीक्षकपदी कर्तव्य बजावले. त्यानंतर त्यांना उपअधीक्षक पदी बढती मिळाली होती. त्यांनी करवीर आणि शाहूवाडी पोलिस उपअधीक्षक पदाची धुरा सक्षमपणे सांभाळी. त्यानंतर ते सध्या पिंपरी चिंचवड येथे सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून कर्तव्य बजावत होते. त्यांची आज करवीर पोलिस उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. डॉ. अमृतकर यांनी शहर पोलिस उपाधीक्षक म्हणून काम पाहिले. गेली दोन वर्ष ते करवीर पोलिस उपाधीक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. त्यांची पिंपरी चिंचवड येथे बदली झाली. 

हे पण वाचा -  राज्य शासनाचा निर्णय डावलून तेथे केंद्र शासनाने हस्तक्षेप करणे ही पद्धत योग्य नाही

 

  
संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: R R patil Appointment of Deputy Superintendent Karveer Police station