रात्रीस खेळ फक्त शर्यतींचा चाले ; कोणत्याही परिस्थितीत शर्यत होणारच

race of ox restricted but in ichalkaranji night races are organised in ichalkaranji kolhapur
race of ox restricted but in ichalkaranji night races are organised in ichalkaranji kolhapur
Updated on: 

इचलकरंजी (कोल्हापूर) : बंदी असताना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धाब्यावर बसवून शिरोळ तालुक्‍यातील जांभळी-हरोली गावच्या माळावर बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले जात आहे. शनिवारी पहाटे लाखांच्या बक्षिसांची असणारी घोडा, बैलगाडी शर्यत घेऊन आयोजकांनी लाखोंची उलाढाल केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात बंदी असताना शिरोळ तालुक्‍यात सुरू असणाऱ्या बैलगाडी शर्यती पोलिसांपुढे आव्हान ठरले आहे. ‘दिवस उजाडला की शर्यत संपते’ असे विदारक चित्र या माळावर नित्याचेच झाले आहे.

काही वर्षांपासून बैलगाडी शर्यतींवर महाराष्ट्रात बंदी असताना अनेक ठिकाणी बैलगाडी शर्यतीवर पोलिसांनी पायबंद घातला. मात्र, शिरोळ तालुक्‍यात बैलगाडी शर्यतींचे राउंड सुरूच आहे. तालुक्‍यातील जांभळी - हरोलीचा माळ शौकिनांना बैलगाडी शर्यतसाठी उत्तम आहे. छोट्या पद्धतीने शर्यतींचे आयोजन करण्याचे प्रमाण वाढले आहे. तालुक्‍यासह इतर ठिकाणचे आयोजक या माळावर शर्यतींचे आयोजन करतात.

मात्र, शनिवारी सकाळी झालेल्या बैलगाडी शर्यतीने पोलिसांनाच आव्हान दिले. प्रथम क्रमांकाला मोटारसायकल, दुसऱ्या क्रमांकास २५ हजार, तर तिसऱ्या क्रमांकाला अठरा हजार रोख बक्षीस होते. चार दिवस अगोदर आयोजकांनी शर्यतीचे नियोजन केले. कोणत्याही परिस्थितीत शर्यत होणारच, ही टॅगलाईन सोशल मीडियावरून प्रत्येक बैलगाडी शर्यतीला असते. यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्‍यात आली आहे. अशा बैलगाडी शर्यतींना लगाम घालून बैलगाडी शर्यती थांबवणे गरजेचे आहे.

जांभळी-हरोलीचा माळ हॉटस्पॉट

आठवडा उलटला की विशिष्ट दिवशी जांभळी - हरोलीच्या माळावर बैलगाडी शर्यत पाहायला मिळतात. कारवाईच्या भीतीने सकाळी सातच्या आत शर्यती आटोपल्या जातात. दिवसेंदिवस वाढणाऱ्या घोडा, बैल, शर्यतींमुळे हा माळ शर्यतींचा हॉटस्पॉट बनला आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pethwadgaon Hatkanangale road accident HDFC bank manager death
leopard sighting on Phulewadi Lakshatirth road in Kolhapur
Kolhapuri Jaggery Crisis
Mahadwar Road Procession In Kolhapur Jawan Shows Quick Response By Carrying Unconscious Woman To Hospital
Marathi News Esakal
www.esakal.com