कदंलगावातील जुगार अड्डयावर छापा ; 7 जण ताब्यात

Raid on a gambling den in Kadanlgaon kolhapur
Raid on a gambling den in Kadanlgaon kolhapur

कोल्हापूर - कंदलगाव रोडवरील केएमटी कॉलनीत बंद खोलीत सुरू असणाऱ्या तीन पानी जुगार अड्डयावर करवीर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या पथकाने छापा टाकला. अड्डयातील 17 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोकडसह पावणे दोन लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला.

गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे - बाबासो विठ्ठल पुजारी (रा. वाशी ता. करवीर), धुलेंद्र नवनाथ पवार (रा. रामानंदनगर), नंदकुमार रामचंद्र गायकवाड, (रा. महालक्ष्मीनगर, मंगळवार पेठ), सदांनद महादेव पाडळकर (रा. पाडळकर वसाहत, हॉकी स्टेडियमजवळ), बादशहा नबीसाब शेख (रा. रंकाळा टॉवर), किरण अनंत गवळी (मंगळवार पेठ), श्रावण दत्तू भालकर (रा. भारती विद्यापीठ परिसर), प्रसाद रामचंद्र भोरे (रा. सुभाषनगर), सागर संभाजी पाडळकर (रा. पाडळकर कॉलनी, हॉकी स्टेडियमजवळ) मोनेश्री भिमाण्णा पाटील (रा. कंदलगाव, करवीर), मिलींद मारुती गुरव (रा. कळंबा ता. करवीर), उत्तम रघुनाथ भोसले (रा. जुना बुधवार पेठ), कमलेश पुनमचंद ओसवाल (रा. भक्तीपूजानगर), संतोष विठृल आडनाईक, (रा मंगळवार पेठ), अभिजीत राजेंद्र पोवार (रा. कंदलगाव), हरिष राजेंद्र ओसवाल (रा. प्रतिभानगर), संदीप सदाशिव इंगवले (रा. केएमटी कॉलनी, कंदलगाव रोड)

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, करवीर पोलिस उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांना कंदलगाव रोडवरील केएमटी कॉलनीतील एका बंद खोलीत पत्ताचा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. गुरूवारी रात्री उशिरा त्यांनी या अड्डयावर छापा टाकला. यात 15 संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत ही खोली संदीप इंगवलेची असून जुगार अड्डा मालक हरिष ओसवाल असल्याचे चौकशीत पुढे आले. त्यानुसार 17 संशयितावर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 9 हजार 630 रूपयाची रोकड, 14 मोबाईल संच, फर्निचर, चार मोटारसायकल असा 1 लाख 88 हजार 630 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. कोरोना संसर्गकाळात या सर्वांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालनही करण्यात आले नव्हते. संबधितांवर करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे डॉ. अमृतकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com