शाहूपुरीतील ऑनलाईन जुगार अड्डयावर छापा, आठ जणांवर गुन्हा

राजेश मोरे
Friday, 27 November 2020

कोल्हापूर ः शाहूपुरीत सुरू असणाऱ्या ऑनलाईन जुगार अड्डयावर करवीर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी छापा टाकला. बेवसाईटच्या आधार घेऊन हा जुगार खेळला जात होता. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. छाप्यात 36 हजारांहून अधिकची रक्कम व मोबाईल संच जप्त केला. 

कोल्हापूर ः शाहूपुरीत सुरू असणाऱ्या ऑनलाईन जुगार अड्डयावर करवीर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी छापा टाकला. बेवसाईटच्या आधार घेऊन हा जुगार खेळला जात होता. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. छाप्यात 36 हजारांहून अधिकची रक्कम व मोबाईल संच जप्त केला. 
गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे ः सट्टा मालक - गणेश योगेश काटे (रा. प्रतिभानगर), राहूल चंद्रकांत बन्ने, सलमान जमादार (दोघे रा. शाहूपुरी), ओंकार चौगले (रा. प्रतिभानगर), विकी मोरे (रा. शाहूपुरी), सुदर्शन किरोळकर (रा. टाकाळा), वासीम युनूस नाकवारा (रा. मंगळवार पेठ) व एक अनोळखी अशी नावे आहेत. 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, प्रतिभानगरातील संशयित गणेश काटेने जुगारासाठी तयार करण्यात आलेल्या विशिष्ट वेबसाईट तयार करणाऱ्या मालक, विक्रेत्याशी संगणमत करून ऑनलाईन जुगार अड्डा सुरू केला. त्याआधारे क्रिकेट बेटींग, तीन पानी, अंदर बहार पत्त्याचा जुगार अड्डा चालवतो. त्या वेबसाईटमध्ये छेडछाड करून लोकांची फसवणूक करत असल्याची माहिती करवीर पोलिस उपाधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांना मिळाली. त्यानुसार डॉ. अमृतकर यांच्या पथकाने शाहूपुरी पाचवी गल्लीत सापळा लावला. येथून 24 नोव्हेंबरला सायंकाळी संशयित सट्टा मालक याचा हस्तक संशयित राहूल बन्नेला ताब्यात घेतले. त्याच्याकडील मोबाईलची तपासणी करून चौकशी केली. असता शाहूपुरी परिसरात फिरून गणेश व वेबसाईट तयार करणारा मालक, विक्रेत्याशी संगणमत करून स्वतःच्या फायद्यासाठी मोबाईलवरून जुगार अड्डा चालवत होता. त्याच्याकडून 36 हजार 450 रूपयांची रोकड व मोबाईल संच असा 46 हजार 450 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी बन्ने व काटे याच्याकडील कामगार संशयित सलमान जमादार, ओंकार चौगुले, विकी मोरे, सुदर्शन किरोळकर, वासिम नाकवारासह अज्ञात अशा आठ जणांवर शाहूपुरी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

ऑनलाईन साईटवर छेडछाड 
एका बेवसाईच्या माध्यमातून दीड वर्षापासून ऑनलाईन जुगार अड्डा चालवला जात होता. यात ऑनलाईन पैसे स्विकारून जुगार खेळणाऱ्यांना ऍप डाऊनलोड करण्याचा पासवर्ड दिला जात होता. त्याआधारे क्रिकेटसह पत्याचा जुगार खेळला जात होता. यात जुगार खेळणाऱ्यांना कमीत कमी पैसे लागावेत (मिळावेत) अशी बेवसाईटमध्ये छेडछाड केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात हाती आली आहे. त्याआधारे मुळापर्यंत जावून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

संपादन - यशवंत केसरकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raid on online gambling den in Shahupuri, crime against eight persons