Video - काँग्रेस पक्ष रसातळाला का गेला? राजू शेट्टी यांनी सांगितले कारण

 धनाजी सुर्वे 
Tuesday, 26 January 2021

अशा वृत्तीमुळेच काँग्रेस पक्ष रसातळाला गेला आहे. आता तर या पक्षाचे फक्त अवशेष राहीले आहेत,

कोल्हापूर - स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली काल (दि. २५) सांगली ते कोल्हापूर असा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता. या रॅलीदरम्यान शेट्टी आणि इतर कार्य़कर्त्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कोल्हापुरातील लक्ष्मीपूरी पोलिसांत त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती शेट्टी यांनी ईसकाळशी बोलताना दिली. त्याबाबत नाराजी व्यक्त करत शेट्टी यांनी सतेज पाटील, जयंत पाटील, हसन मुश्रीफ, बाळासाहेब थोरात यांच्यावर का गुन्हा दाखल नाही? काँग्रेस यामुळेच रसातळाला गेली. असी खरमरीत टीका त्यांनी केली आहे. 

याबाबत शेट्टी यांच्यासोबत ईसकाळने संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही कालचा मोर्चा हा अचानक काढला नव्हता तर स्वाभीमानीच्या ट्रॅक्टर रॅलीबद्दल पोलिस प्रशासनाला चार दिवस आधीच सांगितले होते. त्याचवेळी पोलिसांनी आम्हाला परवानगी नाकारली आहे असं पत्र द्यायला पाहिजे होतं पण तसं पत्र दिलं नाही. प्रशासनाच्या नियमानुसार दोन ट्रॅक्टरमध्ये तीन मीटरचे अंतर आवश्यक होतं. आम्ही तर दोन ट्रॅक्टरमध्ये १५ मीटरचे अंतर ठेवले होते. मग सोशल डिस्टन्सचा भंग कसा काय होतो. याआधी सतेज पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालीही ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. त्यावेळी फक्त कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला, पाटील आणि थोरात यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाहीत मग आमच्यावरच का गुन्हे दाखल झाले. परवा जिल्हा परिषदेचा कार्यक्रम झाला त्यावेळी सोशल डिस्टन्सचे पालन झाले होते का असा प्रश्न विचारत सर्वसामान्यांसाठी वेगळे कायदे आहेत का असा प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.  

“अशा वृत्तीमुळेच काँग्रेस पक्ष रसातळाला गेला आहे. आता तर या पक्षाचे फक्त अवशेष राहीले आहेत,” तसेच राहिलेले अवशेष जपा नाहीतर हे अवशेषही संपून जातील असा सल्लाही शेट्टी यांनी यावेळी काँग्रेसला दिला. चार दिवसांपूर्वी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात सतेज पाटील, जयंत पाटील, हसन मुश्रीफ या नेत्यांनी कार्यक्रम घेतले होते. या कार्यक्रमा तर सोशल डिस्टन्सचा पूर्ण फज्जा उडाला होता. त्यावेळी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

व्हिडिओ - 

 

<

>


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raju shetti criticism on satej patil congress