Video - राजू शेट्टी यांच्यावर पुण्यात उपचार सुरू ; कार्यकर्त्यांना केले 'हे' आवाहन 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 September 2020

श्री शेट्टी यांना पुण्याला उपचारासाठी दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली होती.

जयसिंगपूर - मी ठिक आहे. चिंता करण्याचे कारण नाही. आणखी चार-पाच दिवस डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली आहे. लवकरच घरी परतेन असा विश्‍वास, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. शेट्टी यांना आपल्या फेसबूकवरून ही माहिती दिली आहे. 

मराठवाड्याच्या दौऱ्यावरुन परतल्यानंतर शेट्टी यांना कोरोनाची लक्षणे दिसू लागली. स्वॅब तपासणीत ते पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्याआधी त्यांचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील हेदेखील पॉझिटीव्ह आले होते. पाटील यांचा गुरुवारी आलेला स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आला असून बुधवारी सायंकाळी श्री शेट्टी यांना उपचारासाठी पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरुवातीला लक्षणे दिसत असल्याने ते होम क्वॉरंटाईन झाले होते. पत्नी आणि मुलालाही लक्षणे जाणवत असल्याने स्वॅब तपासणीत तेही पॉझिटीव्ह आले होते. 

श्री शेट्टी यांना पुण्याला उपचारासाठी दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली होती.

हे पण वाचा -  व्हायरस कार्ड अडकवा अन् कोरोना पळवून लावा

श्री शेट्टी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली जात असताना श्री शेट्टी यांनी आपण ठिक असल्याचे सांगत श्‍वसनाला त्रास होत असल्याने आपण खबरदारी म्हणून पुण्याला उपचारासाठी दाखल झालो आहे. आता कोणताही त्रास नाही. ताप नॉर्मल आहे. बी.पी.शुगरचाही त्रास नाही. डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली औषधोपचार सुरु आहेत. अन्य काही तपासण्या केल्या जात आहेत. चार-पाच दिवसात घरी येईन. कार्यकर्त्यांनी चिंता करु नये असे आवाहन केले आहे.

 

 

हे पण वाचा - बाप रे; शिर धडावेगळे केले अन् गावात येऊन ओरडून सांगू लागला

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raju shetti post on Facebook health routine