''शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणणारी पाकिस्तानची औलाद'' 

सुनील पाटील 
Thursday, 3 December 2020

मोदी सरकारने उद्योजकांच्या फायद्यासाठी केलेले तीन कृषी विधेयक तात्काळ रद्द करावे.

कोल्हापूर : शेतकऱ्यांना जातीयवादी, खलिस्तानी म्हणून हिणवणारे जे आहेत, ते पाकिस्तानची औलाद आहे. परदेशातील लोकांना भारतीय शेतकऱ्यांची बाजू योग्य वाटली म्हणून ते ही पाठिंबा देत आहे. पण, कायम परदेशात असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज केली. 

मोदी सरकारने उद्योजकांच्या फायद्यासाठी केलेले तीन कृषी विधेयक तात्काळ रद्द करावे. हे विधेयक रद्द केले नाही तर केंद्र सरकारला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आज सायंकाळी 7 ते उद्या (शुक्रवारी ता. 4) सकाळी 7 पर्यंत भजन, किर्तन म्हणत आत्मक्‍लेश करत जागर केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या आंदोलनाला शेतकऱ्यांची चांगला प्रतिसाद दिला. 
श्री शेट्टी म्हणाले, मोदी सरकारने केलेल्या कृषी विधेयकाला देश आणि परदेशातूनही विरोध होत आहे. भारतातील शेतकऱ्यांची बाजू परदेशी सरकार घेत आहे. मात्र मोदी सरकारला याचे काहीही घेणे देणे नाही. शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणून हिणवणाऱ्या सरकारला वठणीवर आणले जाईल. वास्तविक शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणणारा पाकिस्तानची औलाद असणार आहे. शेतकऱ्यांना विचारात न घेता, कोरोनाचे लॉकडाऊन सुरु असताना अदानी आणि अंबानीचे गुलाम करणाऱ्यासाठी केंद्र सरकारने घातलेला हा घाट हाणून पाडला जाईल. 

वास्तविक शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कृषी मालाला हमी भाव मिळाला पाहिजे किंवा त्याचा दर ठरवण्याची मुभा शेतकऱ्यां दिली पाहिजे ही या आंदोलनातील प्रमुख मागणी आहे. शिवाय सरकारने उद्योगपतींच्या हितासाठी तीन कृषी विधेयक केले आहे. ते तात्काळ रद्द करावेत. शेतकऱ्यांना अदाणी आणि अंबानींचे गुलाम करु नका. सरकारने शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा आणू नये. त्यांना त्यांच्या हक्काची शेती करु द्यावी, अशी मागणी श्री शेट्टी यांनी केली. कायद्याने बंधनकारक असणारा हमी भाव मिळावा. पण सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. प्रत्येकाला या आंदोलनात जावे असे वाटते. आपण जावू शकत नाही. म्हणून स्वाभिमानी शेतकरी आत्मक्‍लेश आंदोलन करावे लागले असल्याचे ही शेट्टी यांनी सांगितले. यावेळी कार्याध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, अजित पोवार, विक्रम पाटील, राम शिंदे, संजय चौगले, शैलेश आडेक, विठ्ठल मोरे, आण्णा मगदूम, भिमगोंड पाटील, राजू पाटील, सचिन शिंदे, पायगोंडा पाटील, अविनाश मगदूम आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

हे पण वाचाअजबच; मांजर गायब झाल्याने दोघांना काठीने मारहाण

 

कंत्राटी शेती पध्दत शेतकऱ्यांना लुबाडणारी आहे. कोणी स्टार्चचे कंत्राट, कोण कलिंगड घेतो म्हणतो, कोण मका घेतो म्हणतो एकाने (सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता) कोबड्या घेतो म्हणून सांगितले होते. तोही फरार झाला. त्यामुळे शेतकरी अडचणीत आल्याचे उदाहरणही श्री शेट्टी यांनी दिली. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raju shetty criticism on central government