पुढील उपचारासाठी राजू शेट्टी पुण्याला रवाना 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 September 2020

माजी खासदार राजू शेट्टी यांचा कोरोना अहवाल दोन दिवसापूर्वी पॉझिटिव आला होता.

शिरोळ - माजी खासदार राजू शेट्टी यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने पुढील उपचारासीठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. शेट्टी यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नाही, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांचा कोरोना अहवाल दोन दिवसापूर्वी पॉझिटिव आला होता. त्यांच्यावर जयसिंगपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी दुपारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यामुळे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी शेट्टी यांना पुणे येथील हृदयनाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी हलवण्याचा निर्णय घेतला. सर्व सोयींनी युक्त अँब्युलन्सद्वारे त्यांना पुण्याला हलविण्यात आले आहे.

हे पण वाचा - ...आणि जीव वाचविण्यासाठी धडपड सुरू झाली

दरम्यान, शेट्टी यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शेट्टी यांची प्रकृती स्थिर आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. केवळ श्वास घेताना त्रास होत आहे. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना पुण्याला पाठविण्यात आले आहे.

हे पण वाचा प्रसूती वेदनेने विव्हळणाऱ्या  माऊलीला याचाच आधार

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raju Shetty leaves for Pune for further treatment