प्रसूती वेदनेने विव्हळणाऱ्या माऊलीला याचाच आधार

More than a hundred deliveries Dr. Sonali Deshmukh initiative for cpr hospital kolhapur
More than a hundred deliveries Dr. Sonali Deshmukh initiative for cpr hospital kolhapur

कोल्हापूर : कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. अशात रमेशची गरोदर पत्नी कोरोनाबाधित असल्याने क्वारंटईन होती, तिला प्रसव वेदना सुरू झाल्या. गावातील जवळील दोन तीन खासगी दवाखान्यात नेले, तेव्हा बेड शिल्लक नसल्याचे उत्तर आले. कोरोनाबाधित असल्याने उपचार नाकारले गेले, अखेर रुग्णवाहिका थेट सीपीआर रुग्णालयाच्या प्रसूती विभागात आली. तांत्रिक बाबी पूर्ण करून पुढील वैद्यकीय सोपस्कर होऊन मुलगी जन्माला आली. माता व नवजात बालक दोघांची प्रकृती ठीक आहे. 


गेल्या अडीच महिन्यात अशा प्रसूती वेदनेने विव्हळणाऱ्या शंभराहून अधिक कोरोनाबाधित महिलांची बाळंतपणे सीपीआरच्या प्रसूती विभागाने यशस्वी केली आहेत. स्त्री रोग तज्ञ डॉ. सोनाली देशमुख यांच्यासह अन्य चार डॉक्‍टर व २० वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत ही वैद्यकीय सेवा दिली. प्रसूती यशस्वी होताच कोरोनाबाधित मातांना झालेला आनंद आमची ऊर्जा वाढवतो तर त्या महिलांनाही कोरोनाचे संकट दूर करू असा विश्‍वास वाटतो, हे पाहून आमच्या कामाचे समाधान लाभते, असा भाव डॉ. सोनाली देशमुख यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. 


सीपीआरमध्ये बाळंतपणास नेऊ, असे कोणता नवरा म्हटला तरी गरोदर पत्नीपासून सासर माहेरकडील अनेकजण नाक मुरडतात, आमच्या मुलीचे किंवा सुनेचे बाळंतपण सरकारी दवाखान्यात नको, असे सरसकट विधान एका विशिष्ठ वर्गात होते. मात्र गेल्या तीन महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली, गरदोर मातांही बाधित आढळल्या तेव्हा अन्य दवाखान्यात प्रसुतीसाठी जागा मिळणे मुश्‍कील झाले. अशा उच्चवर्गातील अनेक महिला सीपीआरला प्रसूतीसाठी आल्या त्यांची प्रसूती यशस्वी झाली. रमेशची पत्नीही हे एक त्यापैकी एक प्रातिनिधीक उदाहरण आहे.  
सीपीआर मध्‍ये गंभीर बाधितांवर येथे उपचार होतात. तरीही प्रसुती विभाग मात्र क्षमतेने सुरू ठेवला आहे. पाच डॉक्‍टर पैकी तीन जण आजारी पडलेत तरीही मनुष्यबळ अपुरे असल्याचे कारण न सांगता डॉ. देशमुख यांनी बहुतांशी प्रसुती करण्यास रेसिडेंट डॉक्‍टरांची मदत घेतली.

रोज १० प्रसूती
डॉ. देशमुख म्हणाल्या की, ‘‘आमच्या विभागात येणारी महिला कोणही असो, कोणत्याही वर्गातील असो, ती कोरोनाबाधित असली तरी आम्ही तिच्यावर प्रसुतीचे उपचार करतो. एका दिवसात किमान ६ ते १० प्रसूती होतात. यात चार ते पाच सिझरीन होतात. या विभागात ३९ बेड आहेत. ते बहुतेक वेळा सर्व बेड हाऊस फुल्ल असतात जन्माला येणाऱ्या बाळांमध्ये कोरोनाची बाधा लक्षणे दिसलेली नाहीत. तर काही बाळांना कोरोनाची लक्षणे दिसली आहेत. मात्र बहुतेक सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com