कोल्हापूरमध्ये लॉकडाऊनला झाली सुरुवात अन् पहाटे रस्त्यावरच तरूणांचा "डान्स' ; पोलिसांनकडून लाठ्यांचा प्रसाद

Rankala Tower area 3 boys singing and dancing loudly in the streets of
Rankala Tower area 3 boys singing and dancing loudly in the streets of
Updated on

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर काल मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊनला प्रारंभ झाला आहे. सलग सात दिवस हा लॉकडाऊन असेल. मात्र, पहाटे रंकाळा टॉवर परिसरात भर रस्त्यात मोठ्या आवाजात गाणी लावून नाचणाऱ्या तीन तरूणांना पोलिसांनी लाठ्यांचा प्रसाद दिला. 


रस्त्यातच दोन तरुण गाणी लावून नाचत होते आणि तिसरा त्यांचा व्हिडीओ तयार करत होता. तितक्‍यात पोलिस येथे येताच एका तरुणाने दुचाकीवरून तेथून पळ काढला. दोघे गाडीत लपले. त्यांना पोलिसांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण, तितक्‍यात आणखी एक जण तेथून पसार झाला. पोलिसांच्या तावडीत सापडलेल्या एकाला पोलिसांनी चांगलाच चोप दिला आणि बाकीच्या दोघांना बोलावून घेण्यास सांगितले. 


रंकाळा टॉवर परिसरात काही दिवसापूर्वी कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने रंकाळा टॉवर ते रंकाळा स्टॅंडपर्यंतचा रस्ता पंधरा दिवस सील होता. नंतर वाहतूक टॉवरकडून ताराबाई रोडवरून वळविली होती. त्यानंतर रंकाळा स्टॅंडपर्यंतचा रस्ता खुला झाला; पण टॉवरकडून ताराबाई रोडकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. महापालिकेच्या वतीने परिसरात सर्वेक्षण झाले. त्याशिवाय बाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आले.

संस्थात्मक क्वारंटाईन झालेले लोक आता कुठे घरी परतू लागले आहेत. रंकाळा टॉवर परिसर हा दाटीवाटीने वसलेला भाग आहे. त्याशिवाय सतत वाहतूकीने गजबजलेला चौक असल्याने स्थानिक नागरिकांनीच पुढाकार घेवून प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला आहे. मात्र, याच ठिकाणी हा प्रकार घडल्याने परिसरातील नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होवू लागल्या आहेत.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com