कोल्हापूर ः सीपीआर रूग्णालयात नव्याने बसविण्यात आलेल्या ऑक्सिजन टाकीतून ऑक्सिजन पुरवठा सुरू झाला आहे. वीस हजार लिटर क्षमतेच्या ऑक्सिजन टाकीची 300 खाटांना ऑक्सिजन पुरविण्याची क्षमता आहे. तुर्त शंभर खाटांनाही ऑक्सिजनचा पुरवठा तातडीने सुरू होणार आहे. त्याची चाचणी आज यशस्वी पूर्ण झाली. त्यामुळे सीपीआरमधील ऑक्सिजन बेडची सुविधा सक्षम झाली आहे.
जिल्ह्यातील 14 कोवीड सेंटरवर झालेल्या आरोग्य तपासणीत ज्यांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहे. त्यातील सौम्य लक्षणाच्या कोरोनाबाधितांवर जवळच्या कोवीड सेंटरवर उपचार होतात. मात्र ज्यांची प्रकृती गंभीर आहे. अशा रूग्णांना सीपीआरमध्ये पाठवले जाते. मात्र, येथे गेल्या दोन महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने सीपीआरमध्ये गंभीर अवस्थेत उपचार घेण्यास येणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे ऑक्सिजन बेडची कमतरता असल्याने काही कोरोनाबाधितांना खासगी रूग्णालयात जावे लागले. यातून सीपीआरवर टीकाही झाली.

ठोस पाठपुरावा
गंभीर अवस्थेतील कोरोनारूग्णांसाठी ऑक्सिजनची सोय तात्काळ उपलब्ध व्हावी, यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या ठोस पाठपुराव्यातून 20 हजार लिटरची ऑक्सिजन टाकी खरेदी केली आहे. यामधून दिवसाला 450 रूग्णांना ऑक्सिजन पुरवठ्याची सोय होणार आहे. पालकमंत्री पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी चेन्नई येथील व्हीआरव्ही एशिया पॅसिफिक प्रा. लि. कंपनीशी संपर्क साधून ही टाकी मागवली आहे.
तांत्रिक क्षमता अशी
ऑक्सिजन लिक्विड टाकीचा आकार 30 फूट उंच, 2 मीटर व्यास आहे.
400 क्युबिक मीटर प्रती तास क्षमतेचा वेपोरायझर बसला आहे.
20 हजार लिटर क्षमतेची टाकी आहे. या टाकीत 1 लिटर द्रवापासून 850 लिटर वायूरूपात ऑक्सिजन मिळणार आहे. या टाकीतून सीपीआरमध्ये 15 ठिकाणीच्या ऑक्सिजन बॅंकमध्ये पुरवठा होईल. तेथून पाईपलाईनद्वारे रुग्णांच्या खाटांपर्यंत पूरवला जात आहे.

संपादन - यशवंत केसरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.