आयोध्येत उद्या राम मंदिराचे भूमिपूजन ; या शहरात आज सायंकाळपासून मद्य विक्रीवर निर्बंध

अमृत वेताळ
Tuesday, 4 August 2020

श्रीराम मंदिराच्या भुमिपुजनामुळे एका नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे.

बेळगाव : बुधवार (ता.5) अयोध्या येथे श्रीराम मंदिर उभारण्याच्या भुमिपुजनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या काळात शहरासह तालुक्‍यात कायदा आणि सुव्यस्था कायम रहावी, यासाठी मद्यविक्रीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. तसा आदेश अतिरिक्‍त जिल्हा न्यायदंडाधिकारी तथा पोलीस आयुक्‍त डॉ. के. त्यागराजन यांनी जारी केला आहे. 

श्रीराम मंदिराच्या भुमिपुजनामुळे एका नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे या काळात कायदा सुव्यस्थेला धक्‍का पोहचेल अशी कोणत्याही प्रकारची घटना घडू नये, यासाठी पुर्व खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी (ता.4) सायंकाळी 6 पासून ते गुरुवार (ता.6) सकाळी 6 पर्यंत मद्य दुकाने, बार, वाईन शॉप, रेस्टॉरंट, क्‍लब, आणि डेपोतून मद्य पुरवठा करण्यावर निर्बंध असणार आहेत. आदेशाचे उल्लघंन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यागराज यांनी दिला आहे.

हे पण वाचा सार्थिकामुळे वडिलांच्या घामाचे सार्थक; परिस्थितीच्या जाणिवेतून फुलली गुणवत्ता  

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: restrictions on the sale of alcohol in belgaum district