कोरोनामुळे म्हशींचा रोड शो, मिरवणुकींना फाटा 

Road show of buffaloes due to corona, splitting of processions
Road show of buffaloes due to corona, splitting of processions
Updated on

कोल्हापूर :  हौशी कोल्हापूरकर आणि म्हशींवरचं प्रेम हे एक अतूट समीकरणच. दिवाळी-पाडव्याच्या निमित्ताने म्हशींना नटवून त्यांच्या सवाद्य मिरवणुकांचा सोहळा म्हणजे कृतज्ञतेची अनोखी दिवाळी. यंदाही या म्हशी नटल्या. शिंगांना मोरपीस, गळ्यात हार आणि कवड्यांची माळ असा त्यांचा थाट या निमित्ताने अनुभवायला मिळाला; मात्र परंपरा जपताना यंदा कोरोनामुळे रोड शो आणि सवाद्य मिरवणुकांना फाटा देण्यात आला. त्याचवेळी म्हशींना सजवताना "मास्क लावा, कोरोना टाळा' असा संदेशही आवर्जून दिला गेला. 
शहरातील जुन्या पेठांसह कसबा बावडा, सागरमाळ, पाचगावबरोबरच शहर परिसरात दिवाळी-पाडव्यानिमित्त ही परंपरा जपली गेली. रोड शो आणि सायलेन्सर काढून मिरवणुका काढू नयेत किंबहुना कोणत्याही प्रकारे गर्दी करू नये, असे आवाहन गवळी समाजाने केले होते. त्याला यंदा म्हैस मालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आपापल्या परिसरात म्हशींना नटवून त्यांचे विधिवत पूजन झाले आणि परिसरातील मंदिरापर्यंत काही अंतर त्यांना पळवत परंपरा कायम ठेवली. दरम्यान, पंचगंगा घाट, शनिवार पेठ, जुना बुधवार या परिसरांत हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com