तारळे खुर्दमध्ये रस्त्याने घेतला 40 वर्षांनी मोकळा श्‍वास

 The road in Tarle Khurd took a deep breath after 40 years
The road in Tarle Khurd took a deep breath after 40 years
Updated on

कसबा तारळे, : तारळे खुर्द (ता. राधानगरी, जि, कोल्हापूर) येथील चाळीस- पंचेचाळीस वर्षे अतिक्रमणच्या विळख्यात अडकलेल्या रस्त्याने अखेर मोकळा श्वास घेतला. सरपंच आनंदा पाटील, खासकरून मंडल अधिकारी शिवाजी भोसले यांच्या निर्णायक कृतीमुळे हा रस्ता मोकळा झाला. 
कित्येक वर्षे गावांतर्गत असणारा हा रस्ता जवळपास अस्तित्वहीन ठरला होता. रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे झाल्याने गल्लीवाल्यांबरोबरच अन्य ग्रामस्थांचीही मोठी कुचंबणा होत होती. ग्रामपंचायतीच्या वतीने हा रस्ता करण्यासाठी वारंवार प्रयत्न झाले. पण संबंधितांकडून सतत विरोध होत राहिला. 
अखेर सरपंच आनंदा पाटील तसेच सदस्य व स्थानिक नेते मंडळींनी कणखर भूमिका घेत मंडल अधिकारी शिवाजी भोसले यांना या रस्त्याबाबतची अडचण सांगितली. त्यांनी जागेवर पाहणी करून अतिक्रमणे काढण्याबाबतची धडक कृती करण्याचा निर्णय घेतला. प्रथम त्यांनी ग्रामपंचायत व अतिक्रमणाशी संबधितांना नोटीस लागू केली. शनिवारी तातडीने पोलिस बंदोबस्तासह जेसीबी यंत्र बोलावले.अन्‌ अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. काहीजणांनी या कामास विरोध केला. यावेळी संबंधितांची बाजू ऐकून घेत प्रशासन ही कारवाई करण्यावर ठाम असल्याचे सांगितले. यावेळी स्थानिक नेत्यांनीही "रस्ता महत्त्वाचा आहे, त्याला विरोध करू नका' अशी संबंधितांची समजूत घातली. आणि बघता बघता अतिक्रमणे निघून या रस्त्याने मोकळा श्वास घेतला. यावेळी महसूल विभागाचे परिसरातील कर्मचारीही उपस्थित होते. या कृतीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करीत शासकीय यंत्रणेबरोबरच स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचेही अभिनंदन केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com