नोंदणीचा नियम बदलला, बांधकाम कामगाराचा विम्याचा लाभ हिरावला

 The rules of registration changed, depriving construction workers of insurance benefits
The rules of registration changed, depriving construction workers of insurance benefits

कोल्हापूर ः राजेंद्रनगरातील सागर वाळवे हे नोंदणीकृत बांधकाम कामगार होते. त्यांना कोणतेही व्यसन नव्हते, अचानक हृदयविकाराचा झटक्‍याने मृत्यू झाला. कुटूंबातील कर्ता माणूस गेला. पत्नी, लहान मुले, वृध्द आई वडीलांच्या जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाला. अशात बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची नोंदणी व नुतनीकरण प्रक्रिया बंद असल्याने सागर यांच्या नोंदणीचे नुतनीकरण झाले नव्हते. परिणामी त्यांच्या वारसांना मंडळाकडून मिळणारी हक्काच्या अर्थिक मदतीचा लाभ हिरावला आहे. 

वरील एक प्रातिनिधिक उदाहरण आहे मात्र, कल्याणकारी मंडळाच्या सहा महिन्यात नुतनीकरण प्रक्रियेतील अचानक नियम बदलले, नोंदणी व नुतनीकरण प्रक्रिया ऑनलाईन केली. त्याची माहिती बांधकाम कामगारांपर्यंत पोहचलेली नाही. त्याचा फटका बांधकाम कामगारांना बसत आहे. बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे राज्यभरातून 2 लाख 70 हजार अर्ज आले. बदलेल्या नियमाची माहिती नसल्याने योग्य पध्दतीने कागदपत्रे दिली नाहीत किंवा अर्ज भरण्यात त्रुटी राहील्याने 80 टक्के अर्जावर कोणतीही प्रक्रिया झाली नाही. परिणामी गैरसोय होत असल्याची माहिती कामगार संघटना देत आहेत. 
अशात ज्यांचे नुतनीकरण करायचे आहे. त्या कामगारांनी नोंदणीकृत बांधकाम कंत्राटदार किंवा बिल्डरकडून दाखला घ्यावा लागतो, त्यावर आवक जावक क्रमांक असावा, अशी अटही मंडळाने घातली आहे. मात्र अनेक बिल्डरकडे रजिस्टर नसते. त्यामुळे साध्या कागदावर दाखला दिला जातो. तो चालत नसल्याचे मंडळाकडून सांगण्यात येते, यामुळे शेकडो बांधकाम कामगारांचे नुतनीकरण झालेले नाही. 
अशात सागर सारख्या एखाद्या कामगाराचे बरे वाईट झाल्यास त्याच्या वारसांना अर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. ही बाब विचारात घेता कामगार नोंदणी व नुतनीकरण ऑनलाईन प्रक्रिये बरोबर थेट कार्यालयातून सुरू करावी. कोरोनाकाळात मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना विमा रक्कमेचा लाभ मिळाला पाहिजे, अशा मागण्या बांधकाम कामगारांकडून होत आहेत. 


एजंटाकडून पैसे घेण्याचे प्रकार 
जिल्ह्यात काही एजंट ऑनलाईन पध्दतीने कामगार नोंदणीकरून देत असल्याचे सांगतात. त्यासाठी 600 ते 1200 रूपये खर्च मागतात. हा खर्च ऑनलाईन अर्जभरण्यासाठी असल्याचे सांगतात, कामगारांकडून अर्थिक लाभ उकळतात, अशा तक्रारी कामगार सांगत आहेत. 

`लॉकडाऊन काळात कामगारांच्या नोंदणी व नुतणीकरणाचे नवे बदल कामगारांपर्यंत पोहचलेले नाहीत. जो कामगार नोंदणीकृत आहे. त्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना विम्याचा लाभ मिळाला पाहीजे. सागर वाळवे यांच्यासह कामगारांच्या मदतीसाठी आम्ही संघटनात्मक पातळीवर शासनाकडे पाठ पुरावा करणार आहोत.'' 
- प्रशांत आंबी, जिल्हा सचिव बांधकाम कामगार संघटना.

संपादन -यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com