कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी स्वराज्य भवनात धावपळ 

कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी स्वराज्य भवनात धावपळ 
Updated on

कोल्हापूर  : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर सोमवारपासून लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.  शहरातील रस्ते सुनसान आहेत. दुकान, उद्योग, व्यवसाय बंद आहेत; मात्र स्वराज्य भवन येथे जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे काम मात्र अविरतपणे सुरू आहे. जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, तसेच उपजिल्हाधिकाऱ्यांसह सर्वच यंत्रणा कोरोना प्रतिबंधासह महसूलच्या कामात व्यस्त आहे. याशिवाय तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य अधिकारी, पोलिसपाटील यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारीही कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी नेटके नियोजन करत आहेत. जिल्ह्यात समूह संसर्ग वाढत आहे. जसजसे रुग्ण वाढत आहेत तसतसा यंत्रणेवर ताण वाढत आहे. जिल्हा प्रशासन नेटाने कामगिरी बजावत आहे. दररोज नियोजन बैठका, कोणत्या तालुक्‍यात किती रुग्ण वाढले, कोणाला उपचार मिळत नाहीत, औषधांचा साठा देणे, व्हेंटिलेरची सोय, सीपीआरमध्ये रुग्णांची संख्या जास्त झाली आहे, तिथे येणाऱ्या रुग्णांचे इतरत्र नियोजन करण्यापासून लोकांच्या येणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्याचे कामही सुरू आहे. 
मोठ्या प्रमाणात येणाऱ्या रुग्णांची विचारपूस करण्यासाठी किंवा त्यांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध देण्यासाठी अपेक्षित गोळ्या-औषध देण्याचे नियोजन करावे लागत आहे. सध्या केंद्र सरकारकडून आणखी निधी येणे अपेक्षित आहे. सध्या अपेक्षित औषध पुरवठा असेल; पण यापुढील काळात औषध, गोळ्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात लागेल, याचेही नियोजन प्रशासनाला करावे लागणार आहे. 
गांधीनगर, हातकणंगले, इचलकरंजी, शाहूवाडी, चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्‍यांत रुग्णांची संख्या वाढत आहे. या ठिकाणी काम करणारे प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठींसह ग्रामसेवक आणि आरोग्य अधिकाऱ्यांना डोळ्यांत तेल घालून काम करावे लागत आहे. 

काम करणाऱ्यांना 
पाठबळ हवे 
सगळ्यांत जोखमीचे काम म्हणजे जिल्ह्यातून आलेल्या कोरोना रुग्णांच्या नावांची पडताळणी करणे, त्यांना कोठे क्वारंटाईन केले तेथे त्यांचा शोध घेणे, त्यांच्या संपर्कातील लोकांचा दूरध्वनी, तर कधी थेट घरी जाऊन तपासणीसाठी आणणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची धावपळ असे आहे. खासगी-शासकीय दवाखान्यातून कोरोना तपासणीचे नाव आल्यानंतर त्यांची यादी तपासणी, छाननी करणे, नावे, पत्ते, तालुके बरोबर आहेत का? हे सर्वांत जोखमीचे काम करणाऱ्यांना पाठबळ देणे आवश्‍यक आहेविशेषतः जंगलातील खाद्य वनस्पतीवर याचे वास्तव्य असते. श्री. सुतार यांनी सुरक्षितपणे या मादीला पकडून जंगलात सोडून दिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com