esakal | जनावरांच्या गोठ्यात त्या दोघांना बघून नातेवाईकांनी फोडला हंबरडा; गावावरही पसरली शोककळा

बोलून बातमी शोधा

sadashiv surekha bhandigare suicide case in kolhapur marathi news}

 सदाशिव भांदिगरे हे मौनी विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल ॲन्ड रुरल इंजिनिअरिंग कॉलेजचे सेवानिवृत्त कर्मचारी होते.

जनावरांच्या गोठ्यात त्या दोघांना बघून नातेवाईकांनी फोडला हंबरडा; गावावरही पसरली शोककळा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गारगोटी( कोल्हापूर )  : आकुर्डे (ता. भुदरगड) येथील पती-पत्नीने आजारास कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सदाशिव बाळू भांदिगरे (वय ६२) व सुरेखा सदाशिव भांदिगरे (वय ५७) अशी त्यांची नावे आहेत. घटनेची भुदरगड पोलिसात नोंद झाली.सदाशिव भांदिगरे हे मौनी विद्यापीठाचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. ते मनमिळावू व समजूतदार स्वभावाचे होते. त्यांनी पत्नीसह आत्महत्या केल्याची माहिती समजताच सर्वांना धक्का बसला आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. 
             
  पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 

सदाशिव भांदिगरे व सुरेखा भांदिगरे पती-पत्नी आजारी होते. त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते. आज दुपारी घरी कोणी नसल्याचे पाहून दोघांनी साडेबाराच्या सुमारास घराशेजारील जनावरांच्या गोठ्यात लोखंडी पाईपला दोरी व ओढणी बांधून गळफास घेतला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, सकाळपासून दोघांची चाहूल न लागल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता त्यांचे मृतदेह गोठ्यात लटकलेल्या अवस्थेत निदर्शनास आले. यानंतर नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.

हेही वाचा- समरजीतसिंह घाटगे राजकारणाच्या नादात अज्ञान प्रकट करू नका

दोघांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद त्यांचे भाऊ निवृत्ती भांदिगरे यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यानंतर गारगोटी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.  

    
            आयसीआरईला आर्थिक मदत 
 सदाशिव भांदिगरे हे मौनी विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल ॲन्ड रुरल इंजिनिअरिंग कॉलेजचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. नुकताच त्यांनी गुरुवारी कॉलेजला २५ हजार रुपये मदतीचा धनादेश दिला होता. मनमिळावू, समजूतदार व तितकेच परखड स्वभावाने ते परिचित होते. त्यांचा नित्यक्रम सुरळीत असताना अचानक घेतलेल्या या दुर्दैवी निर्णयाने कुटुंबियांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.