सांगलीतील नेर्ले येथे कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ उभारल्या गुड्या 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

शेतकऱ्याच्या पायातील बेड्या काढण्याचे काम मोदी सरकारने केले आहे.

नेर्ले : केंद्र सरकारच्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्याला आता पिकविलेल्या मालाला ज्यादा भाव मिळेल. तो कुठेही विकण्याचे स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने त्याला मिळाले. यामुळे शेतकऱ्याच्या पायातील बेड्या काढण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. याचा आनंद व्यक्त करीत येथील शेतकऱ्यांनी शेतकरी गुढी उभारली असल्याचे मत रयत क्रांती संघटनेचे नेते सागर खोत यांनी व्यक्त केले. ते येथील शेतकऱ्यांनी शेतात विधेयकाच्या समर्थनार्थ  गुढ्या उभारल्याप्रसांगी बोलत होते.

हे पण वाचामी ठरवले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना कधीही भेटू शकतो, पण... ; खासदार संभाजीराजे

 

माजी सरपंच व रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते लालासाहेब पाटील यांच्या शेतात शेतकरी गुढी उभारली. राज्य प्रवक्ते लालासाहेब पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते सागर खोत यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास तालुकाध्यक्ष लालासाहेब धुमाळ, किरण उथळे, बजरंग भोसले, मोहसीन पटवेकर, संतोष पेटकर, स्वप्निल लोहार, ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, शरद बल्लाळ, पांडुरंग पाटील,शेतकरी उपस्थित होते.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sagar sadabhau khot comment on agriculture bill