कोल्हापूर : मराठा संघटनांच्या आक्रमक कार्यकर्त्यांसमोर महावितरण नमले; भरती प्रक्रिया पुढे ढकलली

युवराज पाटील
Wednesday, 2 December 2020

सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी भरती प्रक्रियाच हाणून पाडली. 

कोल्हापूर : सकल मराठा समाजाच्या आक्रमक आंदोलनानंतर महावितरणने नोकर भरतीची प्रक्रिया आज पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. उपकेंद्र सहाय्यक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होती. एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना डावलून भरती होत असल्याने सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी भरती प्रक्रियाच हाणून पाडली. 

महावितरणाच्या स्तरावर उपकेंद्र सहाय्यक पदासाठी भरती सुरू आहे. राज्यभरातून एसईबीसी प्रवर्गातील सुमारे 225 मराठा समाजातील भरतीसाठी पात्र ठरतात. कोल्हापूर विभागात किमान 40 जण त्यासाठी पात्र ठरतात. मराठा आरक्षणास सर्वोच्य न्यायालयाची स्थगिती आहे.मराठा समाजाला डावलून कोणत्याही प्रकारची भरती होता काम नये अशी सकल मराठा समाजाची भावना आहे. याचिकाकर्ते दिलीप पाटील यांनी उमेदवारांसह महावितरणच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयासमोर ठाण मांडले कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात होता.

उर्जामंत्र्यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय, "एक मराठा लाख मराठा' असा घोषणांनी परिसर दणाणून गेला. अखेर पोलिसांनी शिष्टमंडळाची अधिकाऱ्यांशी भेट घडवून अणली. मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांच्याशी चर्चा केली. जेवणाचे ताट मराठा समाजाचे आहे त्यात अन्य जण जेवता आहेत पण मराठा समाज मात्र उपाशी आहे. आता खड्डयात घालायचे चेवढेत राहिलात ते एकदा करा आणि रिकामे व्हा अशी आक्रमक भुमिका पाटील व तोडकर यांनी घेतली. भरतीचा आदेश कोठे आहेत. अशी विचारणा केली असता त्यास समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तोडकर यांनी कागद भिरकाविण्याचा प्रयत्न केला. 
पोलिसांनी तातडीने पावले उचलून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा- प्राध्यापकांना उत्सुकता; मुदतवाढ की थेट पाच वर्षांची नियुक्ती..? -

आंदोलकाचा आक्रमक पवित्रा होता. प्रश्‍नांच्या सरबत्तीमुळे निर्मळे यांच्या केबिनमधीव वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले, आंदोलकांनी निर्मळे यांना तातडीने भरती प्रक्रिया थांबविण्याची विनंती केली. दहा मिनिटांनंतर वेगळी परिस्थिती निर्माण झाली तर आम्ही जबाबदार असणार नाही असेही स्पष्ट केले. 

निर्मळे यांनी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून आंदोलकांची मागणीची माहिती दिली. पुढील आदेश तहोत नाही तोपर्यंत भरती प्रक्रिया पुढे ढकलत असल्याचे निर्मळे यांनी सांगितले. 
त्यांच्या आश्‍वासनानंतर तणावाचे वातावरण निवळले. लेखी म्हणणे देण्याचा आग्रह आंदोलकांनी धरला. स्वप्नील पार्टे, शैलेश जाधव, नितीन देसाई, वीरेंद्र मोहिते,. रोहित खामकर,सतिश कुईगडे, अमित थोरात, विलास जाधव आदि सहभागी झाले.  

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakal Maratha community agitation front of msedcl kolhapur