संभाजीराजेंनी घेतले 'हे' गाव दत्तक...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 March 2020

राधानगरी तालुक्‍यातील बनाचीवाडी गाव खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांसद आदर्श ग्राम योजनेतून दत्तक घेतले आहे

कोल्हापूर - ‘बनाचीवाडी आणि छत्रपती घराण्याचे चार पिढ्यांचे संबंध अधिकच दृढ करण्याच्यादृष्टीने आणि दळणवळण, भौतिक सुविधा पुरविण्यासाठी राधानगरी तालुक्‍यातील बनाचीवाडी गाव खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांसद आदर्श ग्राम योजनेतून दत्तक घेतले आहे,’ असे प्रतिपादन युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी केले. त्या सांसद आदर्श ग्राम बनाचीवाडी दत्तक कार्यक्रमात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सरपंच रेश्‍मा पाटील होत्या, तर ऋतुराज इंगळे प्रमुख उपस्थिती होते.

कुटुंबप्रमुखाची जबाबदारी आमच्यावर

युवराज्ञी संयोगिताराजे म्हणाल्या, ‘‘बनाचीवाडी गाव दत्तक घेतल्यापासून कुटुंबप्रमुखाची जबाबदारी आमच्यावर आली आहे. मंदिराआधी विद्यामंदिरास प्राधान्य देणाऱ्या बनाचीवाडी ग्रामस्थांची प्रबळ इच्छाशक्ती बनाचीवाडी गाव देशात विकासाचे मॉडेल करतील.’’ या वेळी ऋतुराज इंगळे म्हणाले, ‘‘पूर्वी या गावातील लोकांना प्रोटीनयुक्त आहार मिळावा या हेतूने छत्रपती घराणे शिकार करत, त्यामुळे या गावाचे वर्षानुवर्षाचे ऋणानुबंध आणि छत्रपती घराण्यावरील निष्ठा याचे फळ बनाचीवाडीकरांना आता मिळाले आहे.’’ यावेळी विलास रणदिवे, उपसरपंच जयवंत पताडे, फत्तेसिंह सावंत आदीनी मनोगतं व्यक्त केली. याप्रसंगी दतुमामा पार्टे, प्रकाश कानकेकर (मुख्याध्यापक), विलास रणदिवे, अभिजित तायशेट्ये, जयश्री काशीद, शोभा धनवडे, अनिल संकपाळ(पोलिसपाटील), संदीप कोंडवळ, बाळासो नरसाळे, जयवंत धनवडे, बापूसो घोळकर, विनायक फाळके, संजय पोवार,  प्रवीण पवार, प्रवीण ढोणे आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji Raje adopted the banachiwadi village