'सारथीचे उपकेंद्र शाहूनगरी कोल्हापुरात सुरु करा'

the sarathi organisation sub center start from kolhapur it's beneficial for all other district in kolhapur statement gives to pradip sonavane
the sarathi organisation sub center start from kolhapur it's beneficial for all other district in kolhapur statement gives to pradip sonavane

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेचे उपकेंद्र शाहूनगरी कोल्हापुरात व्हावे, या मागणीचे निवेदन सकल मराठा समाज करवीर तालुकातर्फे प्रशिक्षणार्थी तहसीलदार प्रदीप सोनवणे यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर  छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जन्मभूमी आहे. छत्रपती शाहूंच्या नावे चालणा-या सारथी संस्थेचे उपमुख्य केंद्र व्हावे, अशी तमाम शाहूप्रेमी नागरिकांची मागणी आहे. यामुळे फक्त कोल्हापूरच नव्हे तर शेजारील सांगली, सातारा, सिंधुदूर्ग, सोलापूर, रत्नागिरी या मराठा बहूल जिल्हयांनाही याचा फायदा होईल.


सारथी ही मराठा समाजासाठी अत्यंत सक्षमपणे सुरु होती. हजारो गरीब मराठा विद्यार्थ्यांचे भवितव्य घडत असताना मराठा द्वेषभावनेतून सचिवालयातील बाबूंनी कट करुन संस्थेच्या स्वायत्तेवर घाव घालून बिनकामाच्या चौकशीतून गेल्या १० महिन्यांत सारथीचे काम ठप्प केले. मुख्यमंत्र्यांनी जाहीर आश्वासन देऊनही त्यांनी दाद दिलेली नाही. कोल्हापूर येथे १५ नोव्हेंबरला सकल मराठा बांधवांच्या बैठकीत बेमुदत आंदोलन जाहीर करण्यात आले होते. 

संपूर्ण महाराष्ट्रातून सारथी बचाव संकल्प यात्रा पुण्यात धडकणार होती. याच दिवशी राज्य सरकारने सारथीची स्वायतत्ता देण्याचा आदेश दिला. सकल मराठा समाज त्याचे स्वागत केले. शिष्टमंडळात शशिकांत पाटील, एकनाथ जगदाळे, दादासाहेब पाटील, राजेंद्र खराडे, सतेज पाटील, रामचंद्र पवार, कुंडलिक पाटील, बाळासाहेब पाटील यांचा समावेश होता. 

मागण्या अशा - 

- सारथी संस्थेला २००० कोटी रुपयांची भरीव निधीची तरतूद     करावी. 

- संस्थेची स्वतःची इमारत द्यावी.

- संस्था कार्यरत करण्यासाठी पूर्वीच्या ७५ कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना पुन्हा नियुक्त करावे.

- संस्था बंद पडावी, या हेतूने स्वायत्तता खंडित करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी. 

- संस्थेच्या संचालक मंडळाची स्थापना करावी. संस्थेच्या संचालक मंडळावर मराठा समाजाच्या प्रतिनिधींना घ्यावे. 

- समाज हिताची तारादूत संकल्पना पुन्हा कार्यान्वित करावी. 

- कर्तव्यदक्ष व्यवस्थापकीय संचालक परिहार यांच्या चौकशीचा अहवाल तातडीने जाहीर करावा.

- प्रत्येक जिल्ह्यात सारथीचे उपकेंद्रे सुरु करावीत.

संपादन - स्नेहल कदम 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com