esakal | करवीरमध्ये सात ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणात बदल

बोलून बातमी शोधा

sarpanch reservation change in kolhapur karveer taluka}

सातही ग्रामपंचायतीच्या  यापूर्वीच्या सरपंच आरक्षणात फेर बदल करून नव्याने आरक्षण काढण्यात आले

करवीरमध्ये सात ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणात बदल
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कुडित्रे - करवीर तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीमध्ये काढलेले सरपंच पदाचे आरक्षण त्या प्रवर्गातील सदस्य नसल्याने सरपंच पद रिक्त होते. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आज तहसीलदार शितल भामरे-मुळे व नायब तहसीलदार विपीन लोकरे यांनी नव्याने आरक्षण सोडत करवीर पंचायत समितीच्या शाहू सभागृहात काढली.या सातही ग्रामपंचायतीच्या  यापूर्वीच्या सरपंच आरक्षणात फेर बदल करून नव्याने आरक्षण काढण्यात आले. यामुळे आता या सात ग्रामपंचायतीमध्ये  सरपंच निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
   

तालुक्यातील सात ग्रामपंचायतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आरक्षणा अभावी सरपंचपद रिक्त असलेल्या  ग्रामपंचायतीचे फेर आरक्षण काढण्याचा आदेश 1 मार्चला काढला होता.यात उपवडे, भामटे, खाटांगळे, घानवडे, वडकशिवाले, आणि खेबवडे येथील सरपंच पदाचे आरक्षण बदलण्याच्या प्रक्रिया आज पुर्ण झाली. 

यात उपवडे भामटे खाटांगळे घानवडे वडकशिवाले या गावात अनुसुचित जाती स्त्री आरक्षण होते.या ठिकाणी असललेले स्री आरक्षण रद्द करून फेर आरक्षणात अनुसूचित जाती असा  फेरबदल झाला आहे. तर गाडेगोंडवाडी येथे अनुसूचित जाती स्री  ऐवजी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्री आरक्षण निश्चित झाले आहे.

 खेबवडे येथे अनुसूचित जमाती असलेल्या आरक्षणात बदल करून,चिठ्ठी काढून आरक्षण काढण्यात आले,यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण निश्चित झाले. आता या सात ही ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.आठ दिवसात सरपंच पदासाठी निवडी होणार आहेत,अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.यावेळी सात गावातील नूतन सदस्य,पदाधिकारी,ग्रामस्थ उपस्थित होते.   


  संपादन - धनाजी सुर्वे