ब्रेकिग - सारथी संस्थेबाबत 'या' मंत्र्याने केले मोठे विधान 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जुलै 2020

विरोधकांवर टोले लगावून त्यांच्या कामाचा पंचनामा केला. 

कोल्हापूर - सारथी संस्थेबाबात बोलताना मागील सरकारने काय दिवे लावले, असा टोला मदत-पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत लगावला. तर देवेंद्र फणडवीस मुख्यमंत्री असते तर कोरोना बाबतचे प्रश्‍न दोन दिवसांत संपवले असते अशा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर "तो ही वेळ खूप झाला' असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला.

कोकणातील आपत्तीला मदत पोचली नसल्याच्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर त्यांनी ताप आला तरीही तीन-चार दिवस गोळ्या घ्याव्या लागतात, असे सांगून त्यांची खिल्ली उडवली. एकंदरीतच त्यांनी विरोधकांवर टोले लगावून त्यांच्या कामाचा पंचनामा केला. 

सारथी संस्थेच्या कामकाजाबाबत खासदार संभाजीराजे यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. त्याबाबत मंत्र्यांना विचारले असता त्यांनी मागील सरकारने काय दिवे लावले. पन्नास कोटींची तरतूद केली होती. पाचशे कोटींची नाही, असा सवाल करीत कोणत्याही परस्थितीत सारथी संस्था बंद पडणार नाही. ज्या कौशल्याची आवश्‍यकता आहे. ते देवून मराठा समाजातील तरुणांना नोकऱ्या दिल्या जातील, त्यांना कौशल्याचे धडे दिले जातील, यातून संस्थेची व्याप्ती वाढविली जाईल, असे स्पष्ट केले. केवळ फेलोशीप देवून चालणार नाही. त्याचा उपयोग किती होतोय याचाही विचार केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. राजेंनी मुख्यमंत्र्यांच्या सोबत चर्चा करण्याचे म्हटले आहे, त्यांची भूमिका योग्य आहे, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्‍न सुटणार असेल तर आनंदच आहे. मला दिलेल्या निधी इतकाच मी खर्च करू शकतो. याचाही विचार केला पाहिजे. 

हे पण वाचा - ... तर कोरोनाचे प्रश्‍न फडणवीसांनी दोन दिवसांत सोडवले असते

कोकणातील चक्रीवादळानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी मदत पोचली नसल्याचा आरोप केला आहे, याप्रश्‍नावर मंत्री म्हणाले,"" ते विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांची दुसरी कोणती भूमिका असू शकते. एक दिवसांच्या वादळाने सगळं उद्धवस्थ केले. सरकार कोकणवासियांच्या पाठीशी ठाम उभे आहे. 498 कोटींची मदत दिली आहे. नुकसान भरपाई वाढवली आहे. त्यामुळे ताप आला तरीही तीन-चार दिवस गोळ्या घ्याव्या लागतात. हे फडणवीस यांना सांगावे लागते काय ? मदत देण्याचे काम सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत ती पोचली आहे. आठवड्यात सर्वांना वीज मिळणार आहे. कोकणवासियांना कोणत्याही परस्थितीत निधी कमी पडू देणार नाही.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sarthi organization will not close says minister vijay wadettiwar